एक अत्यंत महत्वाची बातमी येताना दिसतंय. कोल्हापूरच्या अंबाबाई आणि जोतिबा मंदिरात उद्यापासून ड्रेस कोड लागू होणार आहे. उन्हाळ्याच्या सुट्यांमध्ये अनेक जण सुट्ट्यांमध्ये विविध देवस्थानांना भेटी देतात. तसेच ऐरवी देखील कोल्हापूरच्या अंबाबाई आणि जोतिबा मंदिरात भाविकांची मोठी गर्दी असते. दरम्यान आता एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. आता मंदिरात जाण्यासाठी ड्रेस कोड लागू केला जाणार आहे
पांरपंरिक पद्धतीनेच कपडे परिधान करूनच मंदिराच प्रवेश दिला जाणार आहे.धार्मिक विधीच्या अनुषंगाने तोकडे कपडे न घालता पारंपारिक पद्धतीने भक्तांनी कपडे परिधान करावेत असं आवाहन पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीनं केलंय. प श्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीने यासंदर्भात परिपत्रक जारी केलंय. करवीर निवासिनी अंबाबाई देवस्थान हे साडेतीन शक्तीपीठापैकी एक महत्त्वाचे पीठ असून या मंदिराचे महत्व फार आहे. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीने प्रसिद्धीपत्रक जारी करत भक्तांना आवाहन केलं आहे.