गेल्या काही दिवसांमध्ये एसटी बसचा अपघाताच्या अनेक धक्कादायक घटना समोर आल्या आहेत. आता पुन्हा एकदा जळगावात
राज्य परिवहन महामंडळाच्या बसचे ब्रेक फेल झाल्याने भीषण अपघात झाला आहे. जळगाव जिल्ह्यातील चोपडा शहरात स्वस्तिक टॉकिज परिसरात एसटीचे ब्रेक फेल झाल्याची घटना समोर आली. ब्रेक फेल झालेल्या एसटीने दोन दुचाकीस्वारांसह चार जणांना चिरडले आहे. या अपघातात दोन जणांचा जागीच जागीच झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.

रवींद्र बहारे (वय 40 वर्ष) व सोनू रशीद पठाण (वय 22 वर्ष) अपघातातील मृतांची नावे असून तर अनिता बहारे व शाकीर शेख हे दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. तर जखमींना चोपडा उपजिल्हा रुग्णालय तसेच खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे. ब्रेक फेल झालेल्या बसने दुचाकीला चिरडल्यानंतर एका रिक्षाला देखील धडक दिल्याची माहिती समोर येत आहे
जळगावच्या चोपडा शहरातील भामरे हॉस्पिटलजवळ आज एस.टी. बसचे ब्रेक फेल झाल्याने दोन दुचाकींना जोरदार धडक बसली. या अपघातात चुंचाळे येथील एक आणि चोपडा येथील नवविवाहित तरुण जागीच मृत्यू झाले. तर तिघेजण जखमी असून एका व्यक्तीवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेनंतर शहरात खळबळ उडाली असून आमदार चंद्रकांत सोनवणे डॉक्टरांना तातडीने उपचाराचे निर्देश दिले. दरम्यान बसने दुचाकीस्वरांना चिरडल्याची संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.एसटी महामंडळाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. लालपरीच्या मेंटेनन्सकडे होत असलेले दुर्लक्ष प्रवाशांच्या जीवावर बेतत आहे.