आयपीएल 2025 स्पर्धा संपल्यानंतर रोहित शर्माने शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला आहे. रिपोर्टनुसार, मागच्या पाच वर्षात रोहित शर्माला हा त्रास जाणवत आहे. त्यामुळे फलंदाजीत त्याचं खूप नुकसान झालं आहे. रोहित शर्माला हॅमस्ट्रिंग इंजरी असून त्याचा त्रास सहन करत आहे. त्यामुळे आयपीएल संपल्यानंतर शस्त्रक्रिया करेल असं सांगण्यात येत आहे. मिडिया रिपोर्टनुसार, रोहित शर्मा 2027 वनडे वर्ल्ड कप खेळू इच्छित आहे. त्यामुळे शस्त्रक्रिया करण्याची ही योग्य वेळ आहे.

रोहित शर्मा गेल्या काही वर्षापासून शस्त्रक्रिया करणं टाळत होता. कारण त्याच्या खांद्यावर संघाची जबाबदारी होती. त्यामुळे मोठ्या स्पर्धांसाठी सर्जरी करत नव्हता. पण आता टी20 आंतरराष्ट्रीय आणि कसोटी संघातून निवृत्ती जाहीर केली आहे. त्यामुळे शस्त्रक्रिया केल्यानंतर त्यातून रिकव्हर करण्यास बऱ्यापैकी वेळ मिळणार आहे. भारतीय संघ पुढच्या महिन्यात कसोटी मालिकेसाठी इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. तसेच पुढचे तीन महिने एकही वनडे मालिका नाही. त्यामुळे रोहित शर्मा शस्त्रक्रिया करू शकतो. तसेच त्याला रिकव्हर होण्यास बऱ्यापैकी वेळ मिळेल.
दरम्यान, रोहित शर्मा आता आंतरराष्ट्रीय टी20 आणि कसोटी मध्ये निवृत्ती घेतली आहे. वनडे क्रिकेटमध्ये अजूनही संघाचं नेतृत्व करणार आहे. 2023 या वर्षी वनडे वर्ल्डकप विजयाचं स्वप्न भंगलं होतं. त्यामुळे 2027 या वर्षी ते पूर्ण करण्याचा मानस आहे. त्यामुळे ही सर्जरी करण्याचा निर्णय रोहित शर्माने घेतला असल्याचे स्पष्ट होतेय.