‘वैष्णवी हगवणे प्रकरणात कारवाई केली जाईल'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
‘वैष्णवी हगवणे प्रकरणात कारवाई केली जाईल'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
img
नंदिनी मोरे
वैष्णवी हगवणे या विवाहितेने आत्महत्या केळ्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही आत्महत्या त्यांनी सासरच्यांचा जाचाला कंटाळून केली असलायचा आरोप आहे. दरम्यान आता या प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई केली असून विष्णवी यांना दिलेले स्त्रीधन जप्त करण्यात आले आहे. तसेच , या प्रकरणात पोलिसांनी वैष्णवीचा पती, तिचा दीर, तिचा सासरा आणि सासू तसेच नणंद यांना अटक केली आहे.  दरम्यान,  आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील कस्पटे कुटुंबाची भेट घेतली आहे. घडलेली घटना ही अतिशय दुर्दैवी आणि माणुसकीला काळीमा फासणारी असल्याचं यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.


काय म्हणाले एकनाथ शिंदे? 

घडलेली घटना ही अतिशय दुर्दैवी आणि माणुसकीला काळीमा फासणारी  आहे. पैसे मागत होते, मारहाण करत होते, या सगळ्या घटना घडत होत्या. लोकांची मानसिकता बदलायला हवी, सून म्हणजे मुलगीच असते. अतिशय दुर्दैवी फोटो आहेत. वैष्णवीच्या आई वडिलांची मानसिकता खालावली आहे.

समाज प्रगत झाला आहे, राज्यात अशा घटना घडणे वाईट आहे. अमानवी घटना आहे.  नऊ महिन्याचं बाळ समोर असातना मुलगी असं करू शकत नाही. या सर्व प्रकरणावर मुख्यमंत्री लक्ष ठेवून आहेत, पोलीस काम करत आहेत. घटनेला जबाबदार असणाऱ्या कोणालाही पाठीशी घालू नये. कुटुंबाची भावना लक्षात घेऊन राज्य सरकार कडक कारवाई करेल, अशा कोणत्याही घटनात राजकारण होता कामा नये, परिस्थिती बदलायला हवी, अशा घटना घडू नये म्हणून कारवाई अपेक्षित आहे, कठोर कारवाई केली जाईल, मुख्यमंत्री लक्ष ठेवून आहेत, उच्चस्तरीय चौकशी सुरू आहे, यामध्ये कोणीही असेल त्याला गृहविभाग सोडणार नाही, कोणालाही पाठिशी घातलं जाणार नाही, असं यावेळी एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

इतर बातम्या
Join Whatsapp Group