धक्कादायक ! नारळ लावण्याचा वादातून  माजी सरपंचाच्या कुटुंबाला बेदम मारहाण, कुठे घडली घटना ?
धक्कादायक ! नारळ लावण्याचा वादातून माजी सरपंचाच्या कुटुंबाला बेदम मारहाण, कुठे घडली घटना ?
img
नंदिनी मोरे
बीड मधील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. या प्रकरणानंतर बीड मधील अनेक घटना उघडकीस आल्या  आहेत. आता पुन्हा एकदा बीडमध्ये धक्कादायक घटना समोर आली आहे. वंजारवाडीमध्ये माजी सरपंचासह जमावाकडून कुटुंबाला बेदम मारहाण करण्यात आली आहे. मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या चौघा जणांवर बीडच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे. गावातील नारळ लावण्याच्या उपक्रमामध्ये सहभाग न नोंदवल्याने वाद झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.


वंजारवाडी गावामध्ये कुंडलिक तांदळे यांच्या कुटुंबाला माजी सरपंचासह जमावाने मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली. घराची तोडफोड करण्यात आली आहे.यामध्ये दोन महिला आणि एक पुरुष गंभीर जखमी असून त्यांचे हात पाय फ्रॅक्चर झाले आहेत. तर इतर चार जण किरकोळ जखमी आहेत.या चौघांवर बीडच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गावामध्ये नारळाचे झाड लावण्याचा उपक्रम होता. या उपक्रमांमध्ये सहभागी का झाले नाही असा जाब विचारत हा हल्ला झाल्याचा आरोप कुंडलिक तांदळे यांनी केला असून या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

वयोवृद्ध महिला देखील मारहाण करण्यात आली असून अंगावरती मोठ्या प्रमाणात व्रण आहेत. मारहाण करताना शेजारच्या व्यक्तींनी मोबाईलमध्ये शूट केलेले व्हिडिओ देखील व्हायरल झाले आहेत. यामध्ये मोठा आरडाओरडा देखील दिसून येत आहे. माजी सरपंचाची गावात मोठी दहशत असून अशा पद्धतीने मारहाण झाल्याने खळबळ उडाली आहे. बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून आरोपींना अटक केला जाणारा काही पाहायला महत्त्वाचा असेल

इतर बातम्या
Join Whatsapp Group