नाशिकचा दौरा आटोपता घेत राज ठाकरे  मुंबईला रवाना, काय आहे  कारण ?
नाशिकचा दौरा आटोपता घेत राज ठाकरे मुंबईला रवाना, काय आहे कारण ?
img
नंदिनी मोरे
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सर्वच राजकीय पक्षांमधील घडामोडींना वेग आला असून, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत देखील हालचाली वाढल्या आहेत. अशातच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पक्ष प्रमुख राज ठाकरे यांचे आज नाशिकमध्ये आगमन झाले होते. मात्र राज ठाकरे यांनी काही तासातच दौरा आटोपता घेतला असून दौरा अर्धा सोडून राज ठाकरे मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहे.


नाशिकला राज ठाकरे सकाळी पोहचले त्यानंतर त्यांनी शहरातील स्थानिक नेते व पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. तसेच काही महिन्यात महापालिकेच्या निवडणुका होणार असल्याने त्यांनी निवडणुकीच्या अनुषंगाने आढावा बैठक घेतली. तर ग्रामीण भागातील पदाधिकाऱ्यांशी देखील त्यांनी चर्चा केली. त्यानंतर काही खासगी कारणामुळे राज ठाकरेंनी दौरा आटोपता घेत मुंबईला रवाना झाले आहे.कौटुंबिक कारणामुळे राज ठाकरे तातडीने मुंबईकडे रवाना झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे .

इतर बातम्या
Join Whatsapp Group