ज्योती मल्होत्राचे पाय आणखी खोलात ! हाती लागले ''हे''  खळबळजनक पुरावे
ज्योती मल्होत्राचे पाय आणखी खोलात ! हाती लागले ''हे'' खळबळजनक पुरावे
img
नंदिनी मोरे
मूळची हरियाणाची असलेली यूट्यूबर ज्योती मल्होत्राची पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली तिची कसून चौकशी केली जात आहे असे असतानाच आता तिच्याबाबत रोजच नवनवे खुलासे होत आहेत. एकीकडे तिची चौकशी केली जात असताना  आता तिच्याविरोधात करण्यात आलेल्या आरोपांबाबत मोठी माहिती मिळाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार ज्योती मल्होत्रा हिच्याजवळचे सर्व इलेक्ट्रॉनिक उपकरणं तसेच डिजिटल अकाऊंट्समधून 12 टेराबाईट डेटा जप्त करण्यात आला आहे.


तपास संस्थांनी काही दिवसांपूर्वी ज्योतीचे मोबाईल, लॅपटॉप तसेच अन्य इलेक्ट्रॉनिक सामान जप्त केले होते. याच सामानातून तब्बल 12 टेराबाईट डेटा मिळवण्यात आला आहे. यामध्ये चॅटिंगचे रेकॉर्ड्स, कॉल लॉग्स, व्हिडीओ फुटेज, आर्थिक व्यवहार तसेच अन्य माहिती आहे. याच डेटाचा उपयोग करून तपास संस्थांना तिच्याविरोधात अनेक पुरावे मिळण्याची शक्यता आहे. या डेटाची मदत घेऊन ज्योती खरंच हेरगिरीच्या प्रकरणात सामील आहे का? ती पाकिस्तानच्या कोणा-कोणाशी संपर्कात होती, याची माहिती मिळण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

पाकिस्तानमध्ये व्हीआयपी ट्रिटमेंट
दुसरीकडे ज्योती मल्होत्रा ही आयएसआयशी संबंध असलेल्या मूळच्या पाकिस्तानी नागरिक असलेल्या चार जणांच्या थेट संपर्कात होती. ज्योतीने पाकिस्तानला भेट दिली होती. या भेटीत तिला पाकिस्तानमध्ये व्हीआयपी ट्रिटमेंट मिळाली होती. ती रस्त्यावर फिरत असताना तिच्याभोवती सहा-सहा बंदुकधारी उभे होते. या लोकांच्या हातात एके-47 बंदुका होत्या. त्यामुळेही ज्योती मल्होत्राची पाकिस्तानमध्ये एवढी पोहोच कशी, असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे.

दरम्यान, ज्योतीजवळ असलेल्या वेगवेगळ्या उपकरणांतून मिळवलेल्या 12 टीबी डेटामध्ये काही पुरावे आढलले तर तिला शिक्षेपर्यंत घेऊन जाणे सोपे होईल. तसेच न्यायालय अशा प्रकारचे डिजिटल पुरावे ग्राह्य धरतं असं पोलिसाचं मत आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group