व्हॉट्सअ‍ॅप च आणखी एक भन्नाट फिचर !  इंस्टाग्राम-फेसबुक प्रमाणे आता व्हॉट्सअ‍ॅपलाही  लॉगआउट करता येणार
व्हॉट्सअ‍ॅप च आणखी एक भन्नाट फिचर ! इंस्टाग्राम-फेसबुक प्रमाणे आता व्हॉट्सअ‍ॅपलाही लॉगआउट करता येणार
img
नंदिनी मोरे
 व्हॉट्सअ‍ॅप आपल्या  यूजर्स साठी  नेहमीच काहीना काही अपडेट घेऊन येत असत जेणेकरून युजर्सला  व्हॉट्सअ‍ॅप चा जास्तीत जास्त आणि सोयीस्कर आनंद घेता येईल. आतापर्यंत व्हॉट्सअ‍ॅप ने अनेक महत्वाचे आणि फायद्याचे असे बदल करून नवनवीन फीचर्स आणलेले आहेत. दरम्यान,  आता व्हॉट्सअ‍ॅप यूजर्सना आणखी एक फिचर उपलब्ध होणार असल्याची माहिती आहे. 

 व्हॉट्सअ‍ॅप यूजर्स साठी  एक मोठी बातमी आहे. आता लवकरच व्हॉट्सअ‍ॅपमध्ये लॉगआउट फीचर उपलब्ध होणार आहे. तुम्ही बरोबर विचार करत आहात, हे अगदी फेसबुक आणि इंस्टाग्रामसारखे असेल. कंटाळा आला की किंवा व्यस्त असताना तुम्ही जसे इंस्टाग्राम आणि फेसबुक बंद करता, तसेच तुम्ही व्हॉट्सअ‍ॅपसाठी देखील तेच करू शकता. हे फीचर चांगले आहे. कारण अनेक वेळा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप्सवरील वारंवार येणारे मेसेज आपल्याला त्रास देतात. अशा परिस्थितीत, जर आपण व्हॉट्सअ‍ॅपमधून लॉग आउट करू शकलो तर आपल्याला काही प्रमाणात दिलासा मिळू शकतो.

Logout फीचर काय आहे?
आतापर्यंत व्हॉट्सअ‍ॅपमध्ये असा कोणताही ऑप्शन नव्हता ज्याद्वारे तुम्ही डिव्हाइसवरून लॉगआउट करू शकता. तुम्ही फक्त अ‍ॅप हटवू शकता किंवा खाते निष्क्रिय करू शकता. पण आता या नवीन लॉगआउट फीचरमुळे काम सोपे होईल.

तुम्ही एकाच डिव्हाइसवरून तुमच्या WhatsApp खात्यातून लॉग आउट करू शकाल. जर तुम्हाला दुसऱ्या डिव्हाइसवर लॉग इन करायचे असेल तर तुम्ही जुन्या डिव्हाइसवरून लॉग आउट करू शकाल. हे फीचर विशेषतः अशा लोकांसाठी फायदेशीर आहे जे एकापेक्षा जास्त डिव्हाइसवर व्हॉट्सअ‍ॅप वापरतात.

प्रायव्हसी सुधारेल: जर तुमचा फोन चुकून दुसऱ्याला ट्रान्सफर झाला किंवा तुम्ही सार्वजनिक डिव्हाइसवर लॉग इन करत असाल. तर तुम्ही लॉग आउट करून तुमचे चॅट सुरक्षित ठेवू शकता.डिव्हाइस कंट्रोल सोपे होईल: आता तुम्हाला तुमचे अकाउंट कोणत्या डिव्हाइसेसमध्ये लॉग इन केले आहे हे कळेल आणि त्यातून लॉगआउट देखील करता येईल. फेसबुक-इंस्टाग्रामसारखा अनुभव: जे लोक आधीच इतर मेटा अ‍ॅप्स वापरतात त्यांनाही असेच ऑप्शंस मिळतील.हे फीचर सध्या बीटा आवृत्तीमध्ये चाचणीत आहे आणि लवकरच ते अँड्रॉइड आणि आयओएस दोन्ही यूझर्ससाठी लाँच केले जाईल.
इतर बातम्या
Join Whatsapp Group