धक्कादायक ! प्रसूतीवेळी महिलेच्या पोटात राहिला कापडी तुकडा ! कुठे घडली घटना ?
धक्कादायक ! प्रसूतीवेळी महिलेच्या पोटात राहिला कापडी तुकडा ! कुठे घडली घटना ?
img
नंदिनी मोरे
प्रसुतीदरम्यान एका महिलेच्या पोटात गॉज पीस राहिला असल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणावरून डॉक्टरांचाहलगर्जीपणा समोर आला आहे. वाशिम जिल्ह्यातील रिसोड येथे एका खाजगी रुग्णालयात हा प्रकार घडला आहे. दरम्यान, छत्रपती संभाजीनगर शहरातील एका खासगी रुग्णालयात एका महिलेची शस्त्रक्रिया करून पोटात गॉज पीस म्हणजेच कापडाचा तुकडा काढण्यात आला आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, वाशिम जिल्ह्यातील रिसोड येथे एका खाजगी रुग्णालयात प्रसूती दरम्यान राहिल्याची तक्रार नातेवाईकांनी दिली असून सुरेखा गणेश काबरा असे पोटातून कपडा काढलेल्या महिला रुग्णाचे नाव आहे. सुरेखा यांची 10 मे रोजी रिसोड येथील एका रुग्णालयात सिजेरियन प्रसूती झाली. त्यानंतर सुरेखा यांचे नेहमी पोट दुखत असल्याने वाशीम येथे सोनोग्राफी करून त्यांचा रिपोर्ट सिझेरियन प्रसूती करणाऱ्या डॉक्टरांना दाखवला तेव्हा त्या डॉक्टरांनी मूत्राशयाचा आजार असल्याचे सांगून उपचार घेण्यास सांगितले. 

मात्र, त्यानंतरही पोट दुखतच राहिले अखेर सुरेखा यांनी छत्रपती संभाजी नगरातील एका खाजगी रुग्णालयात दाखवले. तेव्हा तपासणी अंतिम सुरेखा यांच्या पोटात गॉज पीस असल्याचे निदान झाले आणि याप्रकरणी रिसोड येथील डॉक्टरांवर सुरेखा यांचे पती गणेश काबरा यांनी तक्रार दाखल केली आहे. या घटनेनंतर शस्त्रक्रियेतील सुरक्षा उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत.
इतर बातम्या
Join Whatsapp Group