पुण्यातील वैष्णवी हगवणे या तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. सासरच्यांच्या जाचाला कंटाळून तिने हे पाऊल उचलेल असल्याचा आरोप आहे. या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. दरम्यान, या प्रकरणात नवनवीन खुलासे हिट आहेत. वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात पोलीस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर यांचे नाव सातत्याने चर्चेत होते. सुपेकरांकडून तीन कारागृहांचा कार्यभार काढून घेतल्यानंतर त्यांची बदली उपमहासमादेशक म्हणून होमगार्ड विभागात करण्यात आली .
दरम्यान, जालिंदर सुपेकर यांते नवनवे कारनामे समोर येत आहे. पुण्याच्या अतिरिक्त पदी असताना हगवणे बंधूना नियम डावलून शस्त्र परवाना दिलाच मात्र त्याचबरोबर त्यांनी पुण्याच्या कार्यकाळात 400 शस्त्र परवाने दिल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे.
शशांक हगवणे आणि सुशील हगवणे यांचा मामा असलेले तत्कालीन अतिरिक्त पोलीस आयुक्त जालिंदर सुपेकर यांचं नाव समोर आलंय. हगवणेंना मिळालेल्या शस्त्र परवान्यांवर मामा सुपेकरची सही होती. हगवणे बंधुंना शस्त्रपरवाने मिळवून देण्यासाठी खोटे पत्ते दिल्याच माहिती असूनही परवाने मिळवून दिल्याचा आरोप करण्यात आलाय.