राज्यातील बहुचर्चित मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना सुरुवातीपासूनच चर्चेचा विषय ठरली आहे. दरम्यान आता योजने संदर्भात मोठा निर्णय घेतला जाणार असल्याची शक्यता आहे. मे महिना संपला तरी अजूनही लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये मे महिन्याचे पैसे जमा झालेले नाहीयेत, तसेच त्याबाबत कोणती घोषणा देखील झालेली नाहीये, मे महिन्याचा हाफ्ता बँक खात्यामध्ये कधी जमा होणार? याकडे आता लाडक्या बहिणींचं लक्ष लागलं आहे. दरम्यान मे आणि जून दोन्ही महिन्यांचे पैसे एकत्रच मिळणार असल्याची चर्चा आता सुरू झाली आहे.
दहा जूनला वटपौर्णिमा आहे, वटपौर्णिमा हा सण महिलांसाठी महत्त्वाचा असतो. त्यामुळे वटपौर्णिमेच्या मुहूर्तावर लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये मे महिन्याचे दीड हजार आणि जून महिन्याचे दीड हजार असे तीन हजार रुपये जमा केले जाऊ शकतात अशी चर्चा आता सुरू झाली आहे. मात्र या संदर्भात अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाहीये, त्यामुळे मे चा हाफ्ता कधी जमा होणार याबाबत अजून कोणतीही माहिती समोर आलेली नाहीये.