वैष्णवी हगवणे प्रकरण : सासू आणि नवऱ्याच आणखी एक कांड उघड, पोलिसांकडून कारवाई होणार
वैष्णवी हगवणे प्रकरण : सासू आणि नवऱ्याच आणखी एक कांड उघड, पोलिसांकडून कारवाई होणार
img
नंदिनी मोरे
पुण्यातील वैष्णवी हगवणे या विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली. सासरच्यांचा जाचाला कंटाळून तिने ही आत्महत्या केली असल्याचा आरोप आहे. या प्रकरणात नवनवीन खुलासे होते असून आता प्रकरणाला आणखी एक मोठं वळण आलं आहे. वैष्णवी हगवणेचा नवरा शंशाक हगवणे आणि सासू लता हगवणे यांच्यावर आता आणखी एका गुन्ह्यात अटक होणार आहे. येरवडा तुरुंगात असलेल्या या हगवणे आई-लेकावर म्हाळुंगे पोलीस अटकेची कारवाई करणार आहे.

शशांक हगवणे आणि लता हगवणे यांच्यावर फसवणुकीचा गंभीर आरोप झाल्यानंतर त्यांच्याविरोधात आता नव्या गुन्ह्यांमध्ये कारवाई होत आहे. म्हाळुंगे पोलिसांनी दोघांना अटक करण्यासाठी न्यायालयाची परवानगी मिळाली आहे. लवकरच येरवडा कारागृहातून त्यांना ताब्यात घेतले जाणार आहे.

या दोघांवर जेसीबी मशीनच्या विक्रीवेळी प्रशांत येळवंडे यांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. यासंदर्भात येळवंडे यांनी म्हाळुंगे पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. हगवणे माय-लेकाने जेसीबी मशीन विक्रीच्या व्यवहारात खोटे आश्वासन देऊन आर्थिक फसवणूक केली. या तक्रारीवर न्यायालयात सुनावणी झाली. सुनावणीनंतर न्यायालयाने शंशाक आणि लता हगवणे यांना अटक करण्याची परवानगी दिली.

खेड तालुक्यातील नियोजे गावचे रहिवासी प्रशांत येळवंडे यांनी लता हगवणे आणि शशांक राजेंद्र हगवणे यांच्याविरोधात तब्बल 11 लाखांची फसवणूक झाल्याची तक्रार दाखल केली.

मिळालेल्या माहितीनुसार, मार्च 2022 मध्ये प्रशांत येळवंडे यांनी लता हगवणे आणि शशांक हगवणे यांच्याकडून एकूण 24 लाख रुपये किंमतीचा जेसीबी खरेदी करण्याचा व्यवहार केला होता. सुरुवातीला पाच लाख रुपये रोख देऊन त्यांनी जेसीबी ताब्यात घेतला. परंतु त्यानंतर लक्षात आले की या जेसीबीवर आधीच इंडसइंड बँकेचे 19 लाखांचे कर्ज आहे.हा मुद्दा समोर आल्यानंतर दोन्ही पक्षांमध्ये दरमहा 50 हजार रुपये हप्ते देण्याचा तडजोडीचा करार झाला. त्यानुसार येळवंडे यांनी एकूण 6 लाख 70 हजार रुपये लता हगवणे यांच्या खात्यावर जमा केले. मात्र, या रकमेचा वापर कर्जफेडीसाठी न करता हगवणे कुटुंबाने स्वतःसाठी केला, असा आरोप आहे.

इतर बातम्या
Join Whatsapp Group