नाशिकमधील त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या आगामी सिंहस्थ कुंभमेळा 2026 च्या तयारीला सुरुवात झाली असून भाविकांसाठी आता एक आनंदाची बातमी आहे. आता या बहुप्रतीक्षित सिंहस्थ कुंभमेळ्यातील अमृतस्नानाच्या तारखा जाही झाल्या आहेत. नाशिकमधील कुंभमेळा तब्बल 18 महिने चालणार आहे. आज नाशिकमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत कुंभमेळा बैठक पार पडली. यावेळी या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत.
31 ऑक्टोबर 2026 रोजी कुंभमेळ्याचे ध्वजारोहण होणार आहे. हा भव्य धार्मिक सोहळा तब्बल 18 महिने म्हणजेच 31 ऑक्टोबर ते जुलै दरम्यान नाशिकमधील त्र्यंबकेश्वर येथे संपन्न होणार आहे. कुंभमेळा अधिक दीर्घकालीन आणि नियोजित स्वरूपात पार पडणार आहे. यामध्ये 3 मुख्य शाही स्नान आणि 42 पर्व स्नान समाविष्ट असणार आहेत. शाही स्नान जुलै ते सप्टेंबर दरम्यान दीड महिन्याच्या कालावधीत पार पडणार आहेत.
आज नाशिकमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत कुंभमेळा बैठक पार पडली. या बैठकीत 13 आखड्यांचे साधू महंत, प्रमुख शासकीय अधिकारी उपस्थित होते. त्याशिवाय, मंत्री गिरीश महाजन, दादा भुसेही उपस्थित होते. आजच्य बैठकीत कुंभमेळ्यातील शाही स्नानाच्या तारखांसोबत साधुग्राम, गोदावरी नदी प्रदूषण, कुंभ निधी, प्राधिकरणातील समावेशाबाबत चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
दरम्यान, कुंभमेळ्यात होणाऱ्या प्रमुख स्नानाला शाही स्नान न म्हणता अमृत स्नान म्हणून संबोधण्यात येणार आहे. शाही स्नान हा शब्द मुघल काळाशी संबंधित आहे. त्यामुळे आता शाही ऐवजी अमृत हा शब्द वापरण्याची मागणी महंत राजेंद्र दास महाराज यांनी केली. गोदावरी नदीच्या प्रदूषणाच्या मुद्द्यावर कठोर पावले सरकारने उचलावे, कुंभमेळा प्राधिकरण घोषित करावे, अशी मागणीही त्यांनी केली. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या बैठकीआधी त्यांनी माध्यमांशी बोलताना ही मागणी केली.
नाशिक आणि त्र्यंबकच्या सविस्तर तारखा पाहण्यासाठी खाली क्लीक करा
अटॅचमेंट पहा