
२९ मे २०२५
ठाणे : ठाण्यातील अंबरनाथमध्ये अज्ञात इसमाचा शीर नसलेला मृतदेह आढळून आला आहे. नालिंबी रोडवरील तीन झाडांजवळ हा मृतदेह सापडला असून यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.
मृतदेह टिटवाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीत सापडला असून याबाबतची माहिती मिळताच टिटवाळा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपासाला सुरुवात केली आहे.
या परिसरात रात्रीच्या सुमारास हा अज्ञात इसम मद्यपान करण्यासाठी आला असावा आणि त्यानंतर त्याची हत्या करण्यात आली असावी, असा प्राथमिक अंदाज यानंतर व्यक्त होत आहे.
दरम्यान, या इसमाचं शीर अजून सापडलेलं नसून त्याची ओळख पटवण्याचं काम पोलिसांकडून सुरू आहे.
Copyright ©2025 Bhramar