खळबळजनक : पशुपालनाच्या नावाखाली सुरु होती ड्रग्जची फॅक्टरी ; पोलिसांनी असा केला पर्दाफाश
खळबळजनक : पशुपालनाच्या नावाखाली सुरु होती ड्रग्जची फॅक्टरी ; पोलिसांनी असा केला पर्दाफाश
img
Dipali Ghadwaje
कर्जत : पावसाळी सहलींसाठी किंवा अगदी एकदिवसीय सहलींसाठी लोकप्रिय असणाऱ्या कर्जत इथं अनेक फार्महाऊस पर्यटकांच्या स्वागतासाठी सज्ज असतात. पण, याच कर्जतमधून नुकत्याच समोर आलेल्या एका बातमीनं खळबळ माजली असून, त्यामुळं फार्महाऊस याच शब्दानं धडकीसुद्धा भरू शकते. 


कर्जत तालुक्यातील किकवी इथं शेळीपालन व्यवसायाच्या नावाखाली सुरू असलेल्या अंमली पदार्थ निर्मिती कारखान्याचा मुंबई पोलिसांनी नुकताच पर्दाफाश केला. पोलिसांनी किकवी येथील सावली फार्म हाऊसवर धाड टाकत तिथं केलेल्या कारवाईत तब्बल साडेपाच किलो एम डी ड्रग्ज जप्त केले. 

पोलिसांच्या या कारवाईतून जप्त करण्यात आलेल्या ड्रग्जची किंमत 11 कोटी 5 लाख रुपये इतकी असल्याचं सांगण्यात येत आहे. या गुन्ह्यात आतापर्यंत 24 कोटी 50 लाख रुपये साडेबारा किलो एम डी ड्रग्ज हस्तगत करण्यात आलं असून, 1 कोटी रुपयांचा कच्चा मालदेखील पोलिसांनी जप्त केला आहे. या प्रकरणी आतापर्यंत 6 जणांना अटक करण्यात आली आहे.
 
 
इतर बातम्या
Join Whatsapp Group