धक्कादायक घटना :
धक्कादायक घटना : ".... म्हणून त्याने , २० किलोमीटर पाठलाग करून २ तरुणांवर धाडधाड गोळ्या झाडल्या
img
Dipali Ghadwaje
लठ्ठपणावरुन चिडवल्याने एका व्यक्तीने दोन तरुणांना गोळ्या घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जखमी तरुणांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दोघांवरही उपचार सुरु असून एकाची प्रकृती चिंताजनक असल्याचे म्हटले जात आहे. गोळीबार केल्याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. सदर घटना उत्तरप्रदेशच्या गोरखपूर येथे घडली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार , मांझारिया येथे राहणारे अनिल चौहान आणि शुभम यादव तारकुल्हा मंदिरातील एका कार्यक्रमाला उपस्थित राहिले होते. कार्यक्रमावरुन घरी परतत असताना त्यांच्यावर गोळीबार झाला. यात शुभम गंभीररित्या जखमी झाला, तर अनिलच्या हाताला गोळी लागली. आसपास असलेल्या लोकांनी दोघांनी रुग्णालयात दाखल केले आणि घडलेल्या घटनेची माहिती पोलिसांना दिली.

पोलिसांच्या तपासात अर्जुन चौहान हे नाव समोर आले. शोधमोहीम करुन पोलिसांनी अर्जुनला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान आरोपी अर्जुनने गोळीबार करण्यामागील कारण स्पष्ट केले. तारकुल्हा मंदिराच्या कार्यक्रमात मी होतो. तेव्हा कार्यक्रम सुरु असताना अनिल आणि शुभम यांनी माझ्या लठ्ठपणाची खिल्ली उडवली. ते मला जाड, लठ्ठ म्हणाले. विरोध केल्यानंतर बाकीच्यांनीही माझी चेष्टा केली, अशी माहिती आरोपीने पोलिसांना दिली.

लठ्ठपणावरुन चिडवल्याने मला खूप वाईट वाटले. त्या दोघांमुळे माझं सगळ्यासमोर हसं झालं. त्यामुळे मी दोघांनाही धडा शिकवण्याचा निर्णय घेतला. २० किलोमीटरपर्यंत मी त्यांचा पाठलाग केला. त्यांच्यासमोर गाडी थांबवली आणि त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. पीडितांच्या तक्रारीवरुन अर्जुन चौहान विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहे. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group