संतापजनक : अल्पवयीन तरुणीचे अपहरण करुन 60 दिवस लैंगिक अत्याचार ; कुठे घडली धक्कादायक घटना
संतापजनक : अल्पवयीन तरुणीचे अपहरण करुन 60 दिवस लैंगिक अत्याचार ; कुठे घडली धक्कादायक घटना
img
Dipali Ghadwaje
महाराष्ट्राला हादरवणारी घटना  घडली आहे. डोंबिवलीत अल्पवयीन तरुणीचे अपहरण करुन 60 दिवस लैंगिक अत्याचार करण्यात आला आहे. या तरुणीचा गर्भपात देखील करण्यात आला. या प्रकरणी चौघांना अटक करण्यात आली आहे.  मात्र, तरुणीचे अपहरण करणारा आरोपी फरार आहे. या घटनेमुळे डोंबिवलीत संतापाची लाट उसळली आहे. 

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार , मसाला विक्री करणाऱ्या एका इसमाने एका सोळा वर्षीय अल्पवयीन तरुणीचे अपहरण करून तिच्यावर अनेक वेळा लैंगिक अत्याचार केला.  पीडित तरुणी गर्भवती राहिल्या नंतर एका महिलेच्या घरी नेऊन तिचा गर्भपात केला. त्यानंतर आरोपीने पीडित तरुणीला एका दाम्पत्याच्या घरी ठेवले. या दाम्पत्याने तिला वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडले. तिच्यावर पुन्हा लैंगिक अत्याचार सुरू होता. 


सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने हा सगळा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. अखेर या टिळक नगर पोलिसांनी महिलेच्या घरी छापा टाकत मुलीची सुटका केली. पोलिसांनी एक महिलेसह तिचा पती ,दोन पुरुष अशा चार जणांना बेड्या ठोकल्यात. धक्कादायक म्हणजे यामधील अटक झालेली मुस्कान शेख या महिलेविरोधात याआधी देखील पीटा अंतर्गत गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे.

पीडित तरुणी आपल्या आई आणि बहिणींसह डोंबिवली जवळील ग्रामीण परिसरात राहते. तिच्या आईचा खाद्यपदार्थ विक्रीचा व्यवसाय आहे. याच व्यवसायातून आशुतोष राजपूत या तरुणाचे त्यांच्या घरी येणे जाणे होते .तो देखील मसाले विक्रीचा व्यवसाय करत होता. याच ओळखीचा फायदा घेत आशुतोषने पीडित अल्पवयीन तरुणीशी ओळख वाढवली.

अल्पवयीन तरुणीने दहावीची परीक्षा दिल्यानंतर तिचे आणि तिच्या आईचे भांडण झाले. या दरम्यान तिचा आशुतोषशी संपर्क झाला. दरम्यान तरुणीला त्याच्या घरी गेली. या संधीचा आशुतोषने फायदा घेतला. तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. मुलगी घरी परतली नाही म्हणून आईने शोधा शोध करण्याचा प्रयत्न केला.

यादरम्यान आशुतोष हा तिच्या आईला भेटत होता. तुमच्या मुलीला आज या ठिकाणी बघितले त्या ठिकाणी बघितले असे सांगून मुलगी शहरातच आहे असे सांगत होता.  मुलगी रागवलेली असल्याने ती परत येईल या आशेने पीडितेची आई आशुतोष वर विश्वास ठेवत होती. 

मात्र दोन महिन्यांपासून मुलगी घरीच न आल्याने तिला संशय आला. तिने याप्रकरणी टिळक नगर पोलीस ठाण्यात मुलीचे अपहरण झाल्याची नोंदवली. पोलिसांनी मुलीचा शोध सुरू केला. 

याचदरम्यान ही मुलगी डोंबिवली जवळील ग्रामीण भागात एका घरात असल्याची माहिती मिळाली पोलिसांनी. या ठिकाणी छापा टाकत या पीडित मुलीची सुटका केली. पीडित मुलीने केलेल्या खुलाशानंतर पोलिसांनी तपासाची चक्री फिरवली. मुस्कान शेख तिचा नवरा यांच्यासह दोन जणांना अटक केली.

चौकशी दरम्यान धक्कादायक माहिती समोर आली. आशुतोष राजपूत याने मुलीचं अपहरण करत तिला एका खोलीत डांबून ठेवले होते. तीच्यावर लैंगिक अत्याचार केला. पिडीता गर्भवती राहिली. तिला एका दुसऱ्या महिलेच्या घरी नेऊन गर्भपात केला. त्यानंतर पुन्हा काही जणांनी तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.

यानंतर त्या ठिकाणाहून या मुलीला मुस्कान शेख नावाच्या एका महिलेच्या घरी डांबून ठेवण्यात आले होते. तिथे या पीडितेला वेश्या व्यवसायात ढकलत तिच्यावर लैंगिक अत्याचार सुरूच असल्याचे समोर आले आहे . या प्रकरणी पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे. 


इतर बातम्या
Join Whatsapp Group