आजकाल विवाहबाह्य संबंध आणि तयातून घडणारे गंभीर गुणे याचे प्रमाण वाढले आहे. कधी कुठे कोणासोबत काय घडेल हे सांगताच येत आंही . दरम्यान अशीच एक घटना उत्तर प्रदेशातून समोर आली आहे.

अलीगडमध्ये राहणाऱ्या मोहम्मद चमन याची पत्नी खैरुन्निशा हिचे तिच्या नंदोई मोहम्मद अली याच्यासोबत प्रेमसंबंध होते. जेव्हा दोघेही एका खोलीत होते, तेव्हा खैरुन्निशाच्या पतीने दोघांना आक्षेपार्ह अवस्थेत पाहिले. पतीने दोघांना एकत्र पाहिल्यावर त्याच्या पाया खालची जमीनच सरकली. त्यानंतर खैरुन्निशा आणि तिच्या नंदोईने मिळून एक कट रचला.
मिळलेल्या माहितीनुसार , अलीने चमनला खोटे बोलून आपल्या मोटरसायकलवर गौतमबुद्ध नगरच्या दादरी येथे नेले. तिथे त्याला खूप दारू पाजली आणि जेव्हा तो पूर्णपणे नशेत होता, तेव्हा त्याच्यावर विटेने वार करून त्याची हत्या केली. त्यानंतर त्यांनी 9 एप्रिल रोजी चमनच्या गायब झाल्याची तक्रार क्वार्सी पोलिस ठाण्यात नोंदवली. खैरुन्निशाने पोलिसांना खोटे निवेदन दिले की, 6 एप्रिलच्या दुपारी कोणाचा तरी फोन आला आणि चमन घरातून निघून गेला, त्यानंतर तो परत आलाच नाही. पोलिसांनी प्रकरणाची चौकशी सुरू केली. चौकशीदरम्यान चमनची पत्नी वेगवेगळ्या कहाण्या सांगत राहिली. त्यानंतर पोलिसांनी तिची कसून चौकशी केली, तेव्हा संपूर्ण कट उघड झाला. हे प्रकरण उत्तर प्रदेशच्या अलीगडचे आहे.
महिलेने कबूल केले की तिचे तिच्या नंदोई मोहम्मद अली याच्यासोबत प्रेमसंबंध होते आणि जेव्हा चमनने त्यांना आक्षेपार्ह अवस्थेत पाहिले, तेव्हा गोष्टी बिघडल्या. चौकशीत असे समोर आले की मोहम्मद अलीने एक सुनियोजित कट रचून चमनला बहाण्याने आपल्या मोटरसायकलवर गौतमबुद्ध नगरच्या दादरी येथे नेले. तिथे त्याला खूप दारू पाजून जेव्हा तो पूर्णपणे नशेत होता, तेव्हा त्याच्यावर विटेने वार करून त्याची हत्या केली. मृतदेह एका निर्जन भागात फेकून दिला.
चमनचा मृतदेह 7 एप्रिल रोजीच दादरी पोलिसांना सापडला होता. पण त्यावेळी त्याची ओळख पटली नव्हती. अज्ञात मृतदेह समजून त्याच्यावर अंतिम संस्कारही करण्यात आले होते. एका महिन्यानंतर जेव्हा खैरुन्निशा आणि मोहम्मद अली यांना अटक झाली आणि त्यांनी गुन्हा कबूल केला, तेव्हा पोलिसांनी जुन्या प्रकरणातील मृतदेहाच्या कपड्यांशी मिळवून ओळख पटवली. अलीगड पोलिसांनी सांगितले की, आरोपींविरुद्ध खून, कट रचणे आणि पुरावे नष्ट करण्याच्या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघांना न्यायालयात हजर केले, जिथून त्यांना न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे. पोलिस आता याचीही चौकशी करत आहेत की या कटात आणखी कोणी सामील होते का.