नाशिकमध्ये शाळेतील मित्राने मैत्रीणीकडून उकळले ६-७ लाख रुपये; इंस्टाग्रामवर तिला विवस्त्र होण्यास भाग आणि घडले असे काही...
नाशिकमध्ये शाळेतील मित्राने मैत्रीणीकडून उकळले ६-७ लाख रुपये; इंस्टाग्रामवर तिला विवस्त्र होण्यास भाग आणि घडले असे काही...
img
Chandrakant Barve
नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- अल्पवयीन मुलांनी आपल्या शाळेतील अल्पवयीन मुलीचे विवस्त्र फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन तिच्याकडून वेळोवेळी एकूण सुमारे सहा ते सात लाख रुपये वसूल केल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच उघडकीस आला आहे.

याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, धमकी देणारी मुले आणि संबंधित मुलगी हे सर्व जण अल्पवयीन असून ते एकाच शाळेत शिकतात. त्यामुळे हे लोण
अल्पवयीन मुलामुलींमध्येदेखील पसरल्याचे स्पष्ट होत आहे.

याबाबत संबंधित अल्पवयीन मुलीने नाशिकरोड पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे, की सन २०२३ मध्ये तिचे ओळख जुने नाशिक परिसरात राहणाऱ्या व तिच्याच शाळेत शिकणाऱ्या दोन अल्पवयीन मुलांसमवेत झाली. मैत्री वाढत गेल्याने त्यांच्यात बोलणेही वाढले, भेटी वाढल्या. त्या दोन मुलैपैकी एकाने त्या मुलीला इंस्टाग्राम वॉर अकाउंट ओपन करण्यास सांगितले. त्यासाठी तिने वडिलांचा खराब झालेला मोबाइल देखील दुरुस्त केला. त्या मुलानेच तिचे अकाउंट क्रीएट करून दिले.

त्यामुळे तिचे दोघांसमवेत इंस्टाग्राम वरही बोलणे व व्हिडिओ कॉल सुरु झाले. एक दिवस तिच्या पालकांना तिच्याकडे मोबाइल असल्याचे समजले. काही दिवस बोलणे होऊ शकले नाही. त्याच्याशी जवळीक वाढल्याने तिने घरातील लॉकर मधून परस्पर पैसे काढत अँपल कंपनीचा मोबाइल घेतला. आणि पुन्हा चॅटिंग सुरु झाले. चांगली मैत्री झाल्याने त्याने एक दिवस तिला भावनिक बोलत त्याने तिला विवस्त्र होण्यास भाग पडून लागला. त्याने सांगिल्याप्रमाणे ती विवस्त्र होऊन त्याच्याशी व्हिडिओ कॉल वर बोलू लागली.

काही दिवसांनी तो काही ना काही कारण देत तिच्याकडे पैसे मागू लागला. एकदा तिने आई-वडिलांच्या लॉकर मधून १० हजार रुपये काढून दिले. त्यानंतर तो वेळो वेळी तिच्या कडे पैशांची मागणी करू लागला. तिने नकार देताच त्याने आपले रंग दाखवण्यास सुरुवात केली. त्याने तिला धमकी दिली की, त्याच्याकडे तिचे विवस्त्र अवस्थेतील फोटो असून तिने पैसे नाही दिले तर तो ते फोटो व्हायरल करेल. या गोष्टीला घाबरून जात ती त्याने मागितले त्या त्या वेळी घरात कोणास काहीही न सांगता त्याला लॉकर मधून पैसे देत गेली. अशा प्रकारे त्याने आतापर्यंत तिच्याकडून ५ ते ६ लाख रुपये लाटले. 

काही दिवसांनी त्याचा मित्र तिला भेटला आणि त्याने तुमच्या दोघांचे "ते" फोटो माझ्याकडे आहेत असे सांगून तिच्याकडून ६० ते ७० हजार रुपये उकळले. त्यानंतर आरोपीच्या बाहीने देखील तुमच्या दोघांचे फोटो माझाकडे आहेत असे सांगितले. मला पैसे दे नाहीतर तुझ्या आई वडिलांना ते फोटो दाखवेल अशी धमकी दिली. तिने सुद्धा ७ हजार रुपये पिडीतेकडून घेतले. काल दि. १६ मी रोजी पीडितेच्या आईला तो मोबाइल सापडला. तेव्हा आईने पीडितेला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता हा सर्व घडलेला प्रताप तिने आईला सांगितला. हे सर्व ऐकताच आईच्या पायाखालची जमीन सरकली. अखेर त्यांनी त्या तिघांविरुद्ध फिर्याद देत नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.   

सध्याची पिढी सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणात असते. ते यात कुठे वाहून जातात त्यांच्यासह त्यांच्या पालकांना देखील थांगपत्ता लागत नाही. त्यामुळे पालकांनी देखील आपली पाल्य काय करता, कुठे जातात, कोना सोबत असतात ही इत्यंभूत माहिती ठेवणे आता फार गरजेचे झाले आहे. एवढ्या लहान वयात मुलं मोबाइल हाताळतात, त्यांना चोरीची सवय लागते आणि मग अशा घटना घडतात. त्यामुळे वेळीच पावले उचलली पाहिजेत. 

इतर बातम्या
Join Whatsapp Group