चार वर्षीय बालिकेच्‍या फुफ्फुसातून काढली धारदार पिन; डॉ.स्‍वप्‍निल साखला व नारायणी हॉस्‍पिटलच्‍या टीममुळे बालिकेला दिलासा
चार वर्षीय बालिकेच्‍या फुफ्फुसातून काढली धारदार पिन; डॉ.स्‍वप्‍निल साखला व नारायणी हॉस्‍पिटलच्‍या टीममुळे बालिकेला दिलासा
img
दैनिक भ्रमर


नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) : अत्‍यंत गुंतागुंतीच्‍या स्‍थितीत असलेल्‍या चार वर्षीय बालिकेला नाशिक येथील प्रसिद्ध नारायणी हॉस्‍पिटलमध्ये दिलासा मिळाला आहे.

बालिकेच्‍या फुफ्फुसात धारदार पिन ब्रोन्‍कोस्‍कोपीद्वारे प्रसिद्ध फुफ्फुस विकारतज्‍ज्ञ डॉ.स्‍वप्‍निल साखला व त्‍यांच्‍या टीमने काढली आहे. त्‍यामुळे मुलीच्‍या जीवाला निर्माण झालेला धोका टळला आहे. 


याबाबत अधिक माहिती अशी की चार वर्षांच्‍या मुलीचे डेंटल रुट कॅनलची प्रक्रिया सुरु असताना तिला खोकला आला. व यामुळे धारदार पिन गिळली गेल्‍याने तिच्‍या फुफ्फुसात जाऊन अडकली. या घटनेमुळे मुलीसह तिचे कुटुंबिय चिंतातुर झाले होते. तातडीने व प्रभावी उपचार कोठे करता येऊ शकते, याची माहिती घेत असतांना त्‍यांना नाशिक येथील प्रसिद्ध फुफ्फुसविकार तज्‍ज्ञ डॉ. स्‍वप्‍निल साखला यांच्‍याबद्दल माहिती मिळाली.

यानंतर दीडशे किलोमीटरचे अंतर पार करुन नातेवाईक त्‍या मुलीला नाशिकला घेऊन आले. नारायणी हॉस्‍पिटल येथे रात्री मुलीला दाखल केल्‍यानंतर डॉ.स्‍वप्‍निल साखला, डॉ. अभिनंदन मुथा, डॉ. तुषार नेमाडे यांच्‍यासह हॉस्‍पिटमधील निष्णात कर्मचार्यांच्‍या टीमने ब्रॉन्‍कोस्‍कोपीद्वारे मुलीच्‍या फुफ्फुसात अडकेलेली धारदार पीन सुखरुप काढण्यात यश मिळविले.     


 विशेष म्‍हणजे कुठलीही चिरफाड न करता व रक्‍तस्‍त्राव न होऊ देता ही पिन काढल्‍याने मुलीच्‍या तब्‍येतीत सुधारणा अतिशय झपाट्याने होऊ शकली व तिच्‍या जीवाला निर्माण झालेला धोका टळला आहे. यापूर्वीदेखील डॉ.स्‍वप्‍निल साखला यांनी अशा स्‍वरुपात बालकांनी गिळलेले नाणे, खोबर्याचा तुकडा आदी विविध पदार्थ फुफ्फुसातून सुखरुप काढतांना बालकांना दिलासा दिलेला आहे. 

इतर बातम्या
Join Whatsapp Group