नाशिक :- नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी 73 वर्षांमध्ये प्रथमच महिला सभापतीपदी विराजमान झाल्या आहेत. या पदावर कल्पना शिवाजी चुंबळे यांची एक मताने आज सभेमध्ये निवड करण्यात आली.
नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती देविदास पिंगळे यांच्यावर अविश्वास प्रस्ताव दाखल केल्यानंतर तो मंजूर झाला होता. यानंतर संचालक शिवाजी चुंबळे यांच्यासमवेत सर्व संचालक हे सहलीला गेले होते.
आज प्रशासनाने नवीन सभापती पदाची निवडणूक घोषित केली होती. या सर्व हालचाली होत असतानाच तिकडे सर्व संचालकांनी एकमताने कल्पना चुंभळे यांना सभापती करण्याचा निर्णय झालेल्या बैठकीत घेतला होता.
आज दुपारी बैठक सुरू झाल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी शशिकांत मंगरुळे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीत एकमताने कल्पना चुंबळे यांना सभापती करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि त्यांनी एकमेव उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळे त्या सभापतीपदी निवडून आल्या.
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या 73 वर्षाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच सभापतीपदी महिला उमेदवार निवडणुकीसाठी आल्या आणि त्यांनी बिनविरोध निवडणूक जिंकण्याची घटना नाशिकच्या इतिहासामध्ये प्रथमच झाली आहे.
या निवडीनंतर सर्व संचालकांनी नवनिर्वाचित सभापती कल्पना चुंभळे यांचे अभिनंदन केले आहे.