
१५ मार्च २०२५
नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- येथील शालिमार परिसरात ऑटोरिक्षाचालक व त्याच्या साथीदाराने एक कार अडवून त्यातील महिला व पुरुषाशी वाद घातला. हा व्हिडिओ आज व्हायरल झाला.
या प्रकरणी रिक्षाचालक मजहर अन्वर खान (रा. कथडा, जुने नाशिक) व त्याचा साथीदार अरबाज रफिक शेख (रा. वडाळा) यांना भद्रकाली पोलिसांनी अटक केली आहे.
विशेेष म्हणजे हा व्हिडिओ शनिवारी सकाळी व्हायरल झाला. त्या व्हिडिओमध्ये दोन जण कारमधील पुरुष व महिला यांच्याशी हुज्जत घालून कार अडवताना दिसून आले. या प्रकरणी पोलिसांनी स्वत: फिर्यादी होऊन भारतीय न्याय संहिता 2023 च्या विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे.
पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक वसंत पवार हे करीत आहेत.
Copyright ©2025 Bhramar