दहिपूलावरील साडी दुकानाच्या गल्ल्यातून लाख रुपये चोरणार्‍या बंटी बबलीला अटक
दहिपूलावरील साडी दुकानाच्या गल्ल्यातून लाख रुपये चोरणार्‍या बंटी बबलीला अटक
img
दैनिक भ्रमर

नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- भद्रकाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दर्पण साडीज् या शोरूमच्या गल्ल्यातून मोठी रक्कम पळविणार्‍या एक महिला व एक पुरुष अशा दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली असून, त्यांच्याकडून 1 लाख 10 हजार रुपयांची रोकड जप्त केली आहे.

याबाबत माहिती अशी, की गेल्या दि. 4 मार्च रोजी वेलसन ऊर्फ लकी प्रेमविलास मोहिते (वय 35, रा. रिव्हॅली अपार्टमेंट, रथचक्र चौक, इंदिरानगर) व पल्लवी शीतल वाईकर यांनी दर्पण साडीज् शोरूमच्या गल्ल्यातून मोठी रक्कम चोरली होती. याबाबत भद्रकाली पोलिसांकडे तक्रार दाखल होती.

या गुन्ह्याचा तपास सुरू असताना गुन्हे शाखा युनिट-1 चे हवालदार प्रशांत मरकड व हवालदार संदीप भांड यांना दि. 14 रोजी खबर्‍यामार्फत माहिती मिळाली, की सदर चोरी करणारे दोघे जण रथचक्र चौकातील रिव्हॅली अपार्टमेंटमध्ये राहत आहेत. ही माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांना देण्यात आली.

यावरून त्यांनी उपनिरीक्षक सुदाम सांगळे, रवींद्र बागूल, हवालदार प्रशांत मरकड, संदीप भांड, प्रदीप म्हसदे, प्रवीण वाघमारे, रमेश कोळी, विशाल काठे, नाझिमखान पठाण, अंमलदार जगेश्‍वर बोरसे, अमोल कोष्टी, महिला पोलीस अनुजा येलवे व मनीषा सरोदे यांचे पथक तयार करून रिव्हॅली अपार्टमेंटमध्ये पाठविले.

या पथकाने या दोघांची चौकशी केली असता त्यांनी दर्पण साडीज् दुकान चोरी केल्याची कबुली दिली व बेडरूमच्या कपाटातील लॉकरमध्ये ठेवलेली 1 लाख 10 हजार रुपयांची रक्कम आरोपींनी पंचांसमक्ष काढून दिली. पुढील कारवाईसाठी आरोपींना भद्रकाली पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

या यशस्वी कामगिरीबद्दल पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, उपायुक्त प्रशांत बच्छाव, सहाय्यक आयुक्त संदीप मिटके आदींनी या पथकाचे अभिनंदन केले आहे.
इतर बातम्या
नाशिक महानगरपालिकेचा

Join Whatsapp Group