नाशिकमध्ये आगीचे सत्र सुरूच, पुन्हा एका फर्निचर दुकानाला लागली आग
नाशिकमध्ये आगीचे सत्र सुरूच, पुन्हा एका फर्निचर दुकानाला लागली आग
img
दैनिक भ्रमर
नाशिक -  आज सायंकाळच्या सुमारास नाशिक शहरामध्ये पुन्हा एकदा फर्निचरच्या दुकानाला आग लागली आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर तातडीने अग्निशमन दलाचे अधिकारी त्या ठिकाणी दाखल झाले आहेत. आग विझविण्याचे काम सुरू आहे.

नाशिक शहरामध्ये आग लागण्याच्या घटना सातत्याने सुरू असून शहरातील तपोवन परिसरामध्ये लागलेली आगीची घटना ताजी असताना ही आग पूर्णपणे अजून विझली नाही तोच पंचवटी परिसरामध्ये आग लागल्याची घटना घडली आहे. याबाबत अग्निशमन दलाच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आज सायंकाळी पावणेआठ वाजेच्या सुमारास शहरातील स्वामीनारायण मठा जवळ असलेल्या एका फर्निचरच्या दुकानाला आग लागली.

ही माहिती अग्निशमन केंद्राला मिळाल्यानंतर तातडीने पंचवटी तसेच मुख्यालयातील अग्निशमन दलाचे बंब हे घटनास्थळी रवाना झाले आहेत. त्याचबरोबर सहाय्यक अग्निशमन अधिकारी प्रदीप बोरसे राजेंद्र नाकील, पी. व्ही. यलमामे, आर. डी. कदम, किशोर पाटील, संजय जाधव, राजू पाटील, रमाकांत खारे, विजय शिंदे, इसाक शेख  संतोष मेंद्रे, विजय ठाकूर  इरफान पानसरे, मुकुंद सोनवणे यांच्यासह अन्य अधिकारी आणि कर्मचारी हे सर्व परिस्थितीवर ताबा मिळविण्यासाठी या ठिकाणी दाखल झाले असून शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत. या ठिकाणी बघ्यांची गर्दी वाढली असून पोलीस देखील या ठिकाणी दाखल झाले आहेत.
इतर बातम्या
Join Whatsapp Group