सणासुदीला नाशिक हादरले; सिडकोत एकाचा धारदार शस्त्राने खुन
सणासुदीला नाशिक हादरले; सिडकोत एकाचा धारदार शस्त्राने खुन
img
दैनिक भ्रमर


सिडको :-शहर आणि होळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा होत असतांनाच जुन्या भांडणाची कुरापत काढून एका युवकावर चार जणांनी प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली.

या हल्ल्यात सुमित देवरे (वय ३०) याचा मृत्यू झाला आहे. या युवकावर अरुण वैरागरने चॉपरने वार करून गंभीर जखमी केले. दरम्यान, त्याला त्वरित शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले.

शुभम पार्क परिसरातील जोसेफ चर्च समोर सुमीत देवरे उभा असतांना अरुण वैरागर याने जुन्या भांडणाची कुरापत काढुन त्याच्याशी वाद केला. यावेळी अरुण वैरागर याने आपल्या जवळ असलेल्या दोन चॉपरने सुमितवर सपासप वार केले.

यावेळी सुमित देवरे हा जागीच कोसळला. दरम्यान, या घटनेची माहिती अंबड पोलिसांना मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक राकेश हांडे यांनी स्वतः त्याला उचलून पोलीस गाडीत टाकले आणि तातडीने जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

या घटनेने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. घटनेची माहिती मिळताच दुय्यम पोलीस निरीक्षक जयंत शिरसाट आणि सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तातडीने घटनास्थळी बंदोबस्त लावला.

हा हल्ला जुन्या वादातून झाल्याचे समोर आले आहे. घटनास्थळी मोठ्या संख्येने जमाव गोळा झाला होता, त्यामुळे पोलिसांना परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी कसरत करावी लागली. 

या प्रकरणी आरोपी अरुण वैरागर याच्या सह अन्य चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु असून पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केला आहे. 

पोलिस उपायुक्त मोनिका राऊत, प्रशांत बच्छाव, सहायक पोलीस आयुक्त शेखर देशमुख, युनिट १ चे मधुकर कड, युनिट २चे हेमंत तोडकर हे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनास्थळाची पाहणी करत आरोपीच्या शोधार्थ पथक रवाना केले.
इतर बातम्या
नाशिक महानगरपालिकेचा

Join Whatsapp Group