सध्या इंडिगो एअरलाईन्सद्वारे ही सेवा सुरू असून, १५ एप्रिल पासून दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळावर टर्मिनल २ च्या देखभाल दुरूस्तीसाठी आता इंडिगोची सर्व उडडाणे टर्मिनल-२ वरून टर्मिलन-१ वर हलविण्यात आली असल्याचे इंडिगोने जाहीर केले आहे.
या पार्श्वभूमीवर, दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर टर्मिनल बदल करण्यात आला असून, १५ एप्रिलपासून इंडिगोची सर्व उड्डाणे टर्मिनल-२ वरून टर्मिनल-१ वर हलविण्यात येणार असल्याचे निवेदन जारी करण्यात आले आहे.
दिल्ली विमानतळ प्रशासनाने यासंदर्भात स्पष्ट केले आहे की, टर्मिनल-२ वर मोठ्या प्रमाणावर देखभाल आणि सुधारणा कामे सुरू होणार असल्याने हा बदल आवश्यक आहे. परिणामी, टर्मिनल-२ येत्या दोन आठवड्यांसाठी बंद राहणार आहे.
नाशिकहून दिल्लीसाठी दररोज सकाळी ९ वाजता इंडिगोची थेट विमानसेवा उपलब्ध आहे. यामुळे नाशिकहून दिल्लीला प्रवास करणार्या प्रवाशांनी आपली तिकिटे तपासून नवीन टर्मिनलमधून उड्डाणाची नोंद घ्यावी, असे आवाहन इंडिगो एअरलाईन्सने केले आहे.