दारू पिण्यासाठी ३० रुपये दिले नाही म्हणून २५ वर्षीय युवकाने संपवले जीवन
दारू पिण्यासाठी ३० रुपये दिले नाही म्हणून २५ वर्षीय युवकाने संपवले जीवन
img
दैनिक भ्रमर

इगतपुरी - आईने दारू पिण्यासाठी ३० रुपये दिले नाही म्हणून २५ वर्षीय युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सायंकाळी उघडकीस आली.

इगतपुरी तालुक्यातील आंबेवाडी येथे ही घटना घडली असून परिसरातील अवैध दारूच्या अड्ड्यांचा विषय ऐरणीवर आला आहे. सायंकाळी साडेपाच वाजता झालेल्या ह्या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये अवैध व्यवसायांबाबत चर्चेला उधाण आल्याचे दिसते आहे.

योगेश भारु ढवळे (वय २५, रा. आंबेवाडी, ता. इगतपुरी) असे आत्महत्या करणाऱ्या युवकाचे नाव आहे. त्याच्या राहत्या घरामध्येच त्याने गळफास घेतल्याचे ध्यानात आल्यावर घोटी पोलिसांना कळवण्यात आले आहे.

घटनास्थळी घोटी पोलीस दाखल झाले असून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे. उत्तरीय तपासणीसाठी इगतपुरी ग्रामीण रुग्णालयात मृतदेह पाठवण्यात आला आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group