सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाने मागितली 70 हजारांची लाच
सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाने मागितली 70 हजारांची लाच
img
दैनिक भ्रमर


नाशिक :- 70 हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकावर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे.

भाऊसाहेब गोविंद काळे असे लाच मागणाऱ्या अधिकाऱ्याचे नाव आहे. त्यांची नेमणूक सध्या एमआयडीसी पोलिस स्टेशन, ता. जि. अहिल्यानगर येथे आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी की, तोफखाना पोलिस स्टेशन कडील दाखल गुन्ह्यामध्ये तक्रारदार यांच्या भावाला चोरीचे सोने विकत घेतले या कारणावरून आरोपी न करण्याच्यासाठी आरोपी काळे यांनी तक्रारदार यांच्याकडे 70,000 रुपये लाचेची मागणी केली.

त्या संदर्भात तक्रारदार यांनी लाप्रवी अहिल्यानगर येथे तक्रार दिली. त्या अनुषंगाने पडताळणी करण्यात आली असता   काळे यांनी तक्रारदार यांचेकडे 70000 रुपये लाचेची मागणी करून ती स्वीकारण्याची तयारी दर्शविली.

त्यांच्यावर भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम सन 1988 चे कलम 7 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group