महावितरणकडून देखभाल व दुरुस्तीची कामे ; उद्या
महावितरणकडून देखभाल व दुरुस्तीची कामे ; उद्या "या" भागातील टप्प्याटप्प्याने वीजपुरवठा राहणार बंद
img
Dipali Ghadwaje
 नाशिक :- महावितरणच्या नाशिक शहर विभाग २ अंतर्गत असलेल्या उपनगर कक्षाला विद्युत पुरवठा करणाऱ्या १३२ केव्ही टाकळी विद्युत उपकेंद्रातून निघणार्‍या ३३ केव्ही विद्युत वाहिनीला लागणार्‍या झाडांच्या फांद्या काढण्यासाठी तसेच विद्युत यंत्रणेच्या देखभाल आणि दुरुस्तीसाठी उपनगर विद्युत वाहिनीवरील भागांचा उद्या दि.१८ मे रोजी सकाळी ८:३० ते दुपारी १:३० वाजेदरम्यान विद्युत पुरवठा टप्याटप्याने बंद असणार आहे.  ग्राहकांनी याची नोंद घ्यावी व सहकार्य करावे असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.


३३/११ केव्ही उपनगर विद्युत उपकेंद्र येथून वीज पुरवठा करणाऱ्या नाशिक उपनगर  भागातील वाहिनीनिहाय प्रामुख्याने खालील भागांचा समावेश आहे.

१) ११केव्ही गांधी नगर वाहिनीवरील अभीष नगर,पंचशील नगर, दत्त मंदिर, दीप नगर, विद्युत कॉलनी,सहकार कॉलनी, एनके नगर, एलआयसी सोसायटी, छोटी जनता परिसर,आंबेडकर नगर, जेके टायर जवळ, टागोर नगर, सिध्दार्थ नगर.

२) ११केव्ही समता नगर वाहिनीवरील टाकळी रोड, समता नगर, इंद्रायणी सोसायटी, रामदास स्वामी नगर, खोडदे नगर, साळवे मळा, राहुल नगर, सोनवणे बाबा चौक, शांती पार्क, फुलसुंदर, जामकर मळा, शेलार फार्म.

३) ११केव्ही इच्छामणी वाहिनीवरील पगारे मळा, अयोध्या नगर, इच्छामनी मंदिर परिसर, शिंदी कॉलनी, खोडदे नगर, व्यापारी बँक परिसर, आम्रपाली, शांती पार्क, श्रम नगर, नंदन व्हॅली, महारुद्र कॉलनी, रघुवीर कॉलनी, जुनी चाळ.

४) ११ केव्ही डीजीपी नगर वाहिनीवरील टागोर नगर,डीजीपी नगर, रविशंकर मार्ग, वडाळा शिवार.

५) ११ केव्ही गांधीनगर एनएमसी वाहिनी वरील

६) ३३ केव्ही गॅरीसन वाहिनी

७) ११ केव्ही आर्टिलरी वाहिनीवरील मनोहर गॉर्डन,जयभवानी रोड, जेतवन नगर.

८) ११ केव्ही नाशिक रोड वाहिनी वरील नाशिक पुणे रोड, उपनगर पोलिस स्टेशन, आयएसपी क्वार्टर, एक्झिक्यूटिव्ह अपार्टमेंट.
इतर बातम्या
Join Whatsapp Group