नाशिक :- रेशन कार्ड काढून देण्याच्या मोबदल्यात 10 हजारांची लाच घेताना एका खासगी इसमासह पुरवठा निरीक्षण अधिकाऱ्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे.
ललित सुभाष पाटील (पुरवठा निरीक्षण अधिकारी (वर्ग 02), पुरवठा विभाग, इगतपुरी, जिल्हा नाशिक) व खाजगी इसम सोमनाथ रामकिसन टोचे (वय 35, रा. भरवीर , तालुका इगतपुरी, जिल्हा नाशिक) अशी लाच घेणाऱ्याची नावे आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार हे त्यांचे गावातील 60 रेशनकार्ड काढून देण्याच्या संदर्भात पुरवठा विभागातील पुरवठा निरीक्षण अधिकारी ललित पाटील व गोसावी यांना भेटले होते. त्यांनी खाजगी इसम सोमनाथ टोचे यांच्या समक्ष प्रत्येक रेशनकार्ड लला 500 रुपये प्रमाणे दर ठरवून त्यापूर्वी 4000 स्विकारले असून उर्वरित 26000 रुपये लाचेची मागणी केली.
त्या संदर्भात तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिलेली होती. तक्रारदार यांचेकडे खाजगी इसम सोमनाथ व ललित पाटील यांनी 26000 रुपयाची मागणी पंचांसमक्ष केली आहे.
यातील खाजगी इसम सोमनाथ टोचे यांनी इगतपुरी पुरवठा विभागातील ललीत पाटील, पुरवठा निरीक्षण अधिकारी यांचेसमक्ष तक्रारदार यांचेकडे ३०,००० रुपये लाचेची मागणी करुन त्यापैकी ४,००० रुपये यापुर्वी ललीत पाटील यांना पोहोच झाल्याचे सांगितले व राहिलेले २६,००० रुपये लाचेची मागणी करुन त्या रक्कमेपैकी 10000 रुपये सोमनाथ टोचे याने स्विकारले आहेत.
त्यांचेविरुध्द भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम सन १९८८ चे कलम ७ (अ), १२ प्रमाणे गुन्हा केला आहे. आरोपीच्या अंगझडती मध्ये मोबाईल मिळून आले आहेत.