नाशिक ग्रामीणच्या पोलीस अधीक्षकपदी बाळासाहेब पाटील
नाशिक ग्रामीणच्या पोलीस अधीक्षकपदी बाळासाहेब पाटील
img
दैनिक भ्रमर


राज्यातील पोलीस अधीक्षक  दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या शासनाने  नुकत्याच बदल्या केल्या. 

नाशिकचे पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांना मुंबईत अपर आयुक्त म्हणून बढती मिळाल्यानंतर  त्यांच्या जागेवर कोणाचीच नियुक्ती झालेली नव्हती. त्यांच्या जागी कुणाची नियुक्ती होणार याकडे लक्ष लागून होते. 

 पालघर येथे पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत असलेले बाळासाहेब पाटील यांची नाशिक ग्रामीणच्या पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. बाळासाहेब पाटील यांनी पालघर येथे चांगल्या प्रकारे कर्तव्य पार पाडले. 

भ्रष्टाचाराविरुद्ध कारवाई करताना पालघरचे पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस दलात अनेक बदल केले. पालघर येथील स्थानिक गुन्हे शाखेत तैनात असलेल्या एका पोलिस कर्मचाऱ्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर ही घटना घडली. ऑडिओ क्लिपमध्ये नीरज शुक्ला नावाचा पोलिस कर्मचारी पैशाची मागणी करत असल्याचा आरोप आहे. या घटनेनंतर, एसपींनी शुक्ला यांची स्थानिक गुन्हे शाखेतून पालघर नियंत्रण कक्षात बदली केली.




इतर बातम्या
Join Whatsapp Group