
२२ मे २०२५
मुंढेगाव ता. इगतपूरी जि. नाशिक येथील जिंदाल पॉलीफिल्म्स या कंपनीच्या पीपी युनिट व पॉलीस्टर युनिटला दि.२१ मे रोजी पहाटे २ वाजेच्या सुमारास आग लागलेली आहे.
कंपनीत पॉलीप्रॉपीलीन चिप्सचा कच्चा मालाचा साठा आहे. पॉलीप्रॉपीलीन चिप्स हे अति ज्वलनशील असल्याने आग विझण्यास वेळ लागत आहे. कंपनीला लागलेल्या आगीत मालाचा नुकसान झालेला आहे. सद्यस्थितीत NDRF ची CBRN टीम घटनास्थळी पोहचलेली आहे.
तसेच जिल्हास्तरीय टीम देखील घटनास्थळी आहे. जिल्ह्यातील अग्नीशमन दल व नजीकच्या जिल्ह्यातील ठाणे व पुणे येथील अग्नीशमन दल घटनास्थळी आग विझविण्याचे काम करत आहेत. प्रॉपेन टँकला कुलींग करण्याचे काम सुरू आहे. आग लागलेल्या ठिकाणापासून प्रॉपेन टँक ३० मीटर अंतरावर आहे.
औद्योगिक सुरक्षा संचालनालयाच्या माहितीनुसार घटनास्थळापासून सद्यस्थितीत १ कि.मी. परीसरातील भाग खबरदारीचा उपाय म्हणून रिकामा करण्यात आलेला आहे. उपविभागीय अधिकारी, इगतपूरी-त्र्यंबकेश्वर यांनी परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले असून कोणतीही व्यक्ती, मिडीया यांनी सदर परिसरात थांबू नये.
Copyright ©2025 Bhramar