
आगामी इंग्लंड दौऱ्यातील कसोटी सामन्यांसाठी बीसीसीआयने भारतीय संघ जाहीर केला आहे. या मालिकेत कर्णधारपदाची धुरा शुभमन गिल कडे सोपविण्यात आली असून उपकर्णधारपदी रिषभ पंतची निवड करण्यात आली आहे.
२० जूनपासून भारत आणि इंग्लंड संघात ५ सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. रोहित शर्मा व विराट कोहलीच्या निवृत्तीनंतर बीसीसीआयने नव्या कर्णधार व उपकर्णधाराची घोषणा केली आहे.
रिषभ पंत कडे यष्टीरक्षक म्हणूनही जबाबदारी असणार आहे. याशिवाय संघात ध्रुव जुरेल, वॉशिंग्टन सुंदर, शार्दूल ठाकूर, प्रसिद्ध कृष्णा, आकाश दीप, अर्शदीप सिंह, कुलदीप यादव आणि करुण नायर यांना संधी मिळाली आहे.
असा असेल भारतीय संघ?
शुभमन गिल (C), ऋषभ पंत (VC, WK), यशस्वी जायसवाल, केएल राहुल, साई सुदर्शन, अभिमन्यु ईश्वरन, करुण नायर, नितीश कुमार रेड्डी, रवींद्र जडेजा, ध्रुव जुरेल (WK), वॉशिंग्टन सुंदर, शार्दूल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, आकाश दीप, अर्शदीप सिंह, कुलदीप यादव.
कसोटी मालिकेचे वेळापत्रक
पहिली कसोटी 20-24 जून (लॉर्ड्स), दुसरा कसोटी सामना २ ते ६ जुलै (बर्मिंगहॅम), तिसरा कसोटी सामना 10 ते 14 जुलै (लॉर्ड्स), चौथा कसोटी सामना 23 ते 27 जुलै (मँचेस्टर) आणि पाचवा कसोटी सामना 31 जुलै ते 4 ऑगस्ट दरम्यान (ओव्हल, लंडन) खेळवला जाणार आहे.