नाशिक :- महावितरणच्या नाशिक शहरातील इंदिरानगर कक्ष अंतर्गत उद्या ३३ केव्ही भूमिगत केबलचे काम सुरू असून नवीन केबल (भारीत) चार्ज करण्यात येणार आहे.
त्यामुळे इंदिरानगर परिसरातील भारत नगर, दिपाली नगर, इंदिरानगर, खोडे नगर, सुचिता नगर, शनी मंदिर परिसरातील विद्युत पुरवठा केबलच्या कामासाठी उद्या दि. 22 रोजी सकाळी 8 ते 10 वाजेपर्यंत बंद करण्यात येणार आहे.
१३२ केवी टाकळी सबस्टेशन मधून ते कावेरी हॉटेलपर्यंत टाकण्यात आलेली नवीन ३३ केव्ही केबल चार्ज करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने शिवाजीवाडी विद्युत उपकेंद्रमधून निघणाऱ्या ११ केव्ही भारतनगर, कल्पतरू नगर, दिपालीनगर, शनि मंदिर नगर व अशोका हॉस्पिटल येथील विद्युत पुरवठा या वेळेत बंद राहील.
ग्राहकांनी याची नोंद घेऊन सहकार्य करावे असे आवाहन महावितरण ने केले आहे.