उपनगर नाक्यावर बेकरीची तोडफोड करून पैसे हिसकावणाऱ्यांना अटक
उपनगर नाक्यावर बेकरीची तोडफोड करून पैसे हिसकावणाऱ्यांना अटक
img
Chandrakant Barve
नाशिकरोड (भ्रमर प्रतिनिधी):- दिवसाढवळ्या तलवारीचा धार दाखवून बेकरीच्या गल्ल्यातून पैसे बळजबरीने पैसे हिसकावून घेणाऱ्या दोन तरुणांना उपनगर पोलिसांनी अवघ्या अर्धा तासात मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले.

त्यानंतर घटना घडली त्या परिसरात त्यांची धिंड काढली. अवघ्या काही वेळेत पोलिसांनी हल्लेखोरांवर कारवाई केल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केलेली आहे.

 याबाबत अधिक माहिती अशी की उपनगर नाका येथील सँडी बेकरी या ठिकाणी दोन नवतरुण दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास हातात धारदार शस्त्र घेऊन प्रवेश केला व बेकरीतील मालक,कर्मचारी यांना तलवारीचा धाक दाखवून फ्रिज व काउंटरच्या काचा फोडल्या. तसेच गल्ल्यातील पाच हजार आठशे रुपये रोख बळजबरीने काढून घेत घटनास्थळावरून पोबारा केला.

घटनेची माहिती उपनगर पोलिसांना समजतात वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे,गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणे हे कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचून संशयितांचा ची माहिती घेत त्यांचा शोध घेतला.

अवघ्या अर्धा तासात पवन मुकुंद अहिरे (वय २०)व संजय गौतम गवळी (वय २१) राहणार ट्रॅक्शन गेट, एकलहरा नाशिक रोड यांना हत्यारा सह ताब्यात घेतले. ताब्यात घेतल्यानंतर उपनगर पोलिसांनी त्यांना चांगलाच खाक्या दाखवीत उपनगर नाका परिसरात त्यांची धिंड काढली. घटना घडल्यानंतर अवघ्या काही वेळात उपनगर पोलीस घटनास्थळी हजर होऊन कार्य तत्परतेने संशय त्यांचा शोध घेतला, याबाबत परिसरात समाधान व्यक्त केले आहे.

पोलिसांनी नवनाथ गोपाल सोसे राहणार दुर्गेश सोसायटी नाशिक रोड यांच्या फिर्यादीवरून संशयित विरोधात बळजबरीने रक्कम मिळण्याबाबत व तीक्ष्ण हत्यार वापरून भीती निर्माण केल्या बाबतचा गुन्हा दाखल केला असून अधिक तपास उपनगर पोलीस ठाण्याचे अधिकारी कर्मचारी करीत आहे.
इतर बातम्या
नाशिक महानगरपालिकेचा

Join Whatsapp Group