चेहडी येथे दोन दुचाकींचा अपघात; अपघातात जावई व सासऱ्याचा दुर्दैवी मृत्यू
चेहडी येथे दोन दुचाकींचा अपघात; अपघातात जावई व सासऱ्याचा दुर्दैवी मृत्यू
img
Chandrakant Barve

नाशिकरोड (भ्रमर प्रतिनिधी): नाशिक महार्गावरील चेहडी येथे झालेल्या दोन दुचाकी च्या अपघातात जावई व सासऱ्या चा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, महेश भारत नरवाडे (वय ३५) राहणार कारखाना रोड, पळसे व त्याचे सासरे अनिल बाबुराव लाजरस (वय ७१) राहणार गोरेवाडी नाशिकरोड हे एक्टिवा दुचाकी क्रमांक MH १५GT ८८३०  वरून पळसे वरून नाशिक रोड कडे येत असताना समोरून धरधाव वेगात येणाऱ्या थंडर स्पोर्ट दुचाकी ने श्रमिक नगर, निळकंठेश्वर मंदिरा जवळ समोरून एक्टिवाला जोरदार धडक दिली,त्यात महेश नरवाडे व अनिल लाजरस हे जावई- सासरे जागीच ठार झाले.

प्रत्यक्षदर्शी यांनी सांगितले की थंडर स्पोर्ट बाईक वरील दोन तरुण अतिशय वेगात आणि इतर गाड्यांना हुलकावणी देत जात होते. वेगवेगळे आवाज दुचाकी मधून ते काढत होते.
महेश नरवाडे व त्यांची पत्नी हे जयराम हॉस्पिटल मध्ये काम करीत होते. सासरे लाजरस हे मुलीला हॉस्पिटल मध्ये भेटण्यास आले होते. म्हणून जावई महेश नरवाडे यांनी सासरे लाजरस यांना जेवणासाठी पळसे येथील घरी घेऊन गेले होते. परत येत असताना हा विचित्र अपघातात या दोघांना आपला जीव गमवावा लागला.

नाशिकरोड पोलिसात याबाबत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे.
इतर बातम्या
नाशिक महानगरपालिकेचा

Join Whatsapp Group