सातपूर : प्रबुद्ध नगर येथील महिंद्रा कंपनीच्या भिंती लगत भीषण आग
सातपूर : प्रबुद्ध नगर येथील महिंद्रा कंपनीच्या भिंती लगत भीषण आग
img
दैनिक भ्रमर
सातपूर :-  प्रबुद्ध नगर येथील महिंद्रा कंपनीच्या भिंती लगत असणाऱ्या मोकळ्या पटांगणात रात्रीच्या सुमारास आग लागली.

सामाजिक कार्यकर्ते सत्यवान चक्रे यांच्या सतर्कते मुळे आज पहाटे दोनच्या सुमारास ही घटना घडली. ही आग कशामुळे लागली याचे कारण समजु शकले नाही. याबाबत चक्रे यांनी तत्काळ औद्योगिक विभागाच्या अग्निशमन विभागाला माहिती दिली. 

अग्निशमन विभागाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली. आत काही दुर्घटना झाली नसली तरी परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले होते.
इतर बातम्या
Join Whatsapp Group