नाशिक : कॉलेज रोड वरील बीवायके कॉलेज परिसरात वाळलेल्या गवताला आग लागली.

भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यानंतर सर्वत्र जल्लोष होत होता. अनेक ठिकाणी फटाके फोडले जात होते. त्याच आनंदात काही जण कॉलेजरोड चौकात फटाके उडवत होते. त्यात ठिणगी बीवायके कॉलेज परिसरात वाळलेल्या गवतात उडाल्याने आग लागली होती.
ही घटना अग्निशमन दलाला समजताच त्यांच्या पथकाने आग आटोक्यात आणले. सुदैवाने यात जिवीत हानी झाली नाही.