Nashik : प्रेयसीवरील अत्याचाराचे अश्लील फोटो पतीला पाठविल्याने संसार उद्ध्वस्त; प्रियकराचा उद्योग
Nashik : प्रेयसीवरील अत्याचाराचे अश्लील फोटो पतीला पाठविल्याने संसार उद्ध्वस्त; प्रियकराचा उद्योग
img
दैनिक भ्रमर

नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- महिलेच्या अज्ञानपणाचा फायदा घेऊन नऊ वर्षे तिच्यावर केलेल्या लैंगिक अत्याचाराचे फोटो व अश्लील व्हिडिओ तयार करून ते महिलेच्या पतीला पाठवून त्यांचा संसार उद्ध्वस्त केल्याप्रकरणी एका तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी महिला ही पंचवटी परिसरात राहते. महिलेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले, की सन 2016 ते दि. 16 फेब्रुवारी 2025 पर्यंतच्या कालावधीत आरोपी तरुणाने तक्रारदार महिलेच्या अज्ञानपणाचा फायदा घेतला. त्यानुसार तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार करून त्याचे अश्लील फोटो व व्हिडिओ काढून ते फोटो व व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली, तसेच हे फोटो आरोपी तरुणाने त्याच्या मित्रांना व तक्रारदार महिलेच्या पतीला पाठवून त्यांचा संसार उद्ध्वस्त केला.

या प्रकरणी प्रथम पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर हा गुन्हा पंचवटी पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सपकाळे करीत आहेत.

इतर बातम्या
Join Whatsapp Group