सुला वाईन रोडवर मद्यपी कारचालकाच्या धडकेत एक ठार
सुला वाईन रोडवर मद्यपी कारचालकाच्या धडकेत एक ठार
img
दैनिक भ्रमर


नाशिक :- सुला वाईन रोडवर पाम स्प्रिंग रिसॉर्ट समोर भरधाव कारच्या धडकेत रस्त्यावर उभ्या असलेल्या एका मजुराचा मृत्यू झाला आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी की, यश सतीश खैरनार (वय 29) हा काल रात्री 12.30 वाजेच्या सुमारास सुला वाईन रोडवरून जीजे 18 इबी 9825 या क्रमांकाच्या इनोव्हा नाशिककडे भरधाव वेगात येत होता.

पाम स्प्रिंग रिसॉर्ट जवळ तो आला असता त्याने रस्त्याच्या कडेला उभे असलेले कमलेशकुमार भगवतीप्रसाद वर्मा (वय 50) यांना उडवले. या अपघातात त्यांचा मृत्यू झाला. यश खैरनार हा दारू पिऊन गाडी चालवत होता अशी माहिती पोलिसांनी दिली.

पोलिसांनी यशला अटक केली असून त्याच्या विरुद्ध तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
इतर बातम्या
नाशिक महानगरपालिकेचा

Join Whatsapp Group