नाशिकमध्ये
नाशिकमध्ये "या" मध्यवर्ती भागात अतिक्रमण हटविले
img
दैनिक भ्रमर
नाशिक (प्रतिनिधी) :- आज शहराच्या मध्यवस्तीतील मेनरोड, संत गाडगे महाराज चौक परिसर, शालिमार तसेच इंदिरा गांधी यांच्या पुतळ्याजवळील परिसरातील नाशिक महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने ५० हून अधिक अतिक्रमण काढले व सुमारे ट्रकभर अतिक्रमण साहित्य जप्त केले.

२०२४ या नववर्षाचे स्वागत दिमाखाने व जोरदार व्हावे याकरिता नाशिक महानगरपालिकेच्या शहरातील गजबजलेल्या मेन रोड, शालीमार, गाडगे महाराज चौक आदी परिसरातील वाढती गर्दी लक्षात घेऊन आज अतिक्रमण मोहीम राबवली.

भद्रकाली परिसर, संत गाडगे महाराज चौक परिसर, मेनरोड, शालिमार तसेच इंदिरा गांधी यांच्या पुतळ्याच्या सभोवताली झालेल्या अतिक्रमणामुळे होणारी मुख्य अडचणी दूर करण्याच्या दृष्टीने मनपाच्या पश्चिम विभागांतर्गत राबविलेल्या या मोहिमेत दुकानदारांनी आपल्या दुकानाव्यतिरिक्त रस्त्यावर मांडलेले साहित्य, हॉकर्स विक्रेते यांनी रस्ता अडवून टाकलेली दुकाने व त्यांचे साहित्य जप्त करण्यात आले.

कपडे विक्रेते, फळ विक्रेते व अन्य वस्तूंचे स्टॉल लावलेल्या हातगाड्या त्यावर कारवाई करण्यात आली. सुमारे पन्नास हून अधिक अतिक्रमणे काढत अतिक्रमण विभागाने ट्रक भर अतिक्रमण साहित्य जप्त केले. यावेळी काही अतिक्रमण विक्रेत्यांनी मोहिमेत अडथळा आणण्याचा प्रयत्न केला; मात्र अधिकाऱ्यांनी त्यांना ना जुमानता ही मोहीम यशस्वी केली.

ही मोहीम मनपाचे उपायुक्त नितीन नेर, पश्चिम विभागाचे अधिकारी योगेश रकटे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमणचे पश्चिम विभाग प्रमुख प्रवीण बागुल, जावेद शेख, सुनील कदम, जगन्नाथ हमारे, मेघनाथ तिडके, रमेश शिंदे, निलेश काळे आदींनी राबविली.
इतर बातम्या
Join Whatsapp Group