प्रेमानंद महाराजांची आश्रमातील भेट अन 5 कोटींचा दावा ! विराट कोहलीचा मोठा खुलासा
प्रेमानंद महाराजांची आश्रमातील भेट अन 5 कोटींचा दावा ! विराट कोहलीचा मोठा खुलासा
img
Nandini khandare More
प्रेमानंद महाराज यांच्या आश्रमाला भेट देण्यासाठी विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांनी ५ कोटी रुपये घेतल्याचा, असा गंभीर दावा फलाहारी बाबा दिनेश शर्मा यांनी केला होता. त्यानंतर सोशल मीडियावर एकच खळबळ उडाली होती. पण यावर आता विराट कोहलीकडून स्पष्टीकरण आले आहे.आता विराट कोहलीच्या टीमने या प्रकरणी एक अधिकृत निवेदन जारी केले आहे.

विराट कोहलीच्या प्रवक्त्याने स्पष्टपणे सांगितले, “आम्ही निःसंदिग्धपणे सांगू इच्छितो की, फलाहरी महाराज दिनेश शर्मा यांनी विराट कोहलीबद्दल केलेले दावे पूर्णपणे खोटे, निराधार आणि वस्तुस्थितीच्या विरुद्ध आहेत. विराट कोहली प्रेमानंद महाराजांना भेटतो कारण त्याची त्यांच्यावर श्रद्धा आणि भक्ती आहे. आम्ही हे दावे तीव्रपणे फेटाळून लावतो आणि माध्यमांना आवाहन करतो की, अशी माहिती प्रसिद्ध करण्यापूर्वी त्यांनी अत्यंत सावधगिरी बाळगावी, तथ्यांची पडताळणी करावी आणि जबाबदारीने वृत्तांकन करावे.” 


फलाहरी महाराजांचे आरोप काय?

फलाहरी महाराजांनी विराट कोहलीबद्दल अनेक दावे केले होते, ज्यात असाही दावा होता की, राजस्थानमधील एका कंपनीने विराट कोहलीला प्रेमानंद महाराजांना भेटायला ५ कोटी रुपयांना आणले होते. आता, त्या कंपनीतील लोक संत असल्याचे भासवून आश्रमात घुसले आहेत आणि मालमत्तेचा व्यवहार करत आहेत.

फलाहरी महाराजांनी असाही दावा केला की, संत प्रेमानंद महाराज हे हिंदू धर्म आणि सनातन धर्मासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. फलाहरी महाराज स्वतःच्या आरोग्यासाठी किडनी दान करण्यास तयार आहेत, पण त्यांनी प्रेमानंद महाराजांना माफियापासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे. काही माफिया सदस्यांना त्यांची बदनामी करायची आहे. या परिस्थितीत, फलाहरी महाराजांनी प्रेमानंद यांना ‘गोवर्धन गिरिराज जी’ म्हणून संबोधण्याचा सल्ला दिला. सध्या, विराट कोहलीच्या टीमने त्यांच्यावरील हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

इतर बातम्या
Join Whatsapp Group