टीम इंडियाच्या विजय परेडनंतर विराट कोहली मुंबईहून थेट लंडनला गेला होता. विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मा आणि अकाय-वामिका लंडनमध्ये आहेत. मुलाच्या जन्मापासून अनुष्का तिथेच राहते. याचदरम्यान एक महत्वाची बातमी समोर आली आहे.
विराट कोहली आणि अनुष्का शर्मा भारतसोडून कायमचे लंडनला शिफ्ट झाल्याचा दावा केला जात आहे. यासंबंधीच्या अनेक पोस्ट सोशल मीडियावर शेअर करण्यात आल्या आहेत. मात्र या दाव्यावर अधिकृत कोणतेही वक्तव्य समोर आलेले नाही.
विराट कोहली आणि अनुष्काबाबत सोशल मीडियावर अनेक चर्चा सुरु आहेत. दोघेही लंडनला शिफ्ट झाल्याचा दावा एका पोस्टमध्ये करण्यात आला आहे. मात्र यावर विराट किंवा अनुष्काकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.
टीम इंडियाने टी-20 विश्वचषक पटकावल्यानंतर विराट दिल्लीला आला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर तो टीम इंडियासह मुंबईला रवाना झाले. मुंबईतील विजयी परेड झाल्यानंतर लगेच रात्री विराट कोहली लंडनसाठी रवाना झाला होता.
विराट-अनुष्काने लंडनमध्ये घर घेतले?
विराट कोहलीची खूप संपत्ती आहे. त्यांची दिल्ली आणि मुंबईत घरे आहेत. रिपोर्ट्सनुसार, कोहलीने अलीबागमध्ये नुकताच 10 कोटी रुपयांचा बंगला खरेदी केला होता. आता तो लंडनमध्ये असल्याचा दावा सोशल मीडियावर केला जात आहे.
अनुष्का बऱ्याच दिवसांपासून लंडनमध्ये आहे. अकायच्या जन्माआधीच ती लंडनमध्ये गेली होती. अकायचा जन्म लंडनमध्येच झाल्याचा दावा केला जात आहे. अकायच्या जन्मामुळे टीम इंडियातून ब्रेक घेऊन कोहली लंडनला गेला होता. महत्त्वाची बाब म्हणजे अनुष्का गेल्या अनेक महिन्यांपासून लंडनमध्ये राहत आहे.