भारतीय क्रिकेट संघातील ''या'' खेळाडूने आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून घेतली निवृत्ती
भारतीय क्रिकेट संघातील ''या'' खेळाडूने आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून घेतली निवृत्ती
img
दैनिक भ्रमर
टीम इंडियाचा  खेळाडू शिखर धवनने क्रिकेटमधून निवृत्तीची घेतल्याची घोषणा   केली आहे. शिखर धवनने आज सकाळी  ट्वीट करत ही माहिती दिली आहे. शिखर धवनच्या या निर्णयनंतर धवनच्या फॅन्सला मोठा धक्का बसला आहे.  शिखर धवनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे.

या 37 वर्षीय खेळाडूने 2010 मध्ये भारताकडून पदार्पण केले होते. आपल्या 13 वर्षांच्या कारकिर्दीत त्याने 34 कसोटी, 167 एकदिवसीय आणि 68 टी-20 सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. शिखर धवनची गणना जागतिक क्रिकेटमधील यशस्वी सलामीच्या फलंदाजांमध्ये केली जाते. २०२२ मध्ये बांगलादेश दौऱ्यावर खेळलेल्या वनडे मालिकेत तो भारतीय संघाकडून शेवटचा खेळला होता. निवृत्तीची घोषणा करताना धवन म्हणाला की, आता मी मागे वळून पाहिले तर मला खूप आठवणी दिसतात आणि जेव्हा मी पुढे पाहतो तेव्हा मला संपूर्ण जग दिसते. 


इतर बातम्या
Join Whatsapp Group