तारीख ठरली! टीम इंडिया
तारीख ठरली! टीम इंडिया "या" तारखेला ऑस्ट्रेलियाला रवाना होणार
img
Dipali Ghadwaje
बॉर्डर गावस्कर कसोटी मालिकेची तारीख आता जवळ येत चालली आहे. न्यूझीलंडविरुद्धची मालिका 3-0 ने गमावल्यानंतर आता उरल्यासुरल्या आशा याच मालिकेवर अवलंबून आहेत. भारताला ही मालिका काही करून 4-0 ने जिंकणं भाग आहे.अशातच एक महत्वाची बातमी समोर आली आहे.  भारतीय संघ दोन गटात ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी रवाना होणार आहे. 

एका वृत्त संस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, टीम इंडिया 10 आणि 11 नोव्हेंबरला ऑस्ट्रेलियाला रवाना होणार आहे. लॉजिस्टिक अडचणींमुळे संपूर्ण संघासाठी एकच व्यावसायिक उड्डाणाची व्यवस्था करणं अशक्य झालं आहे. या तारखा समोर आल्या असल्या तरी अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही.

दरम्यान, भारतीय संघाला ऑस्ट्रेलियातील वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी लवकर जाणं भाग आहे. अन्यथा परिस्थितीशी जुळवून घेण्यात वेळ जाईल त्याचा परिणाम कसोटी मालिकेवर होऊ शकतो.

भारत आणि ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेचं वेळापत्रक

पहिली कसोटी: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (22 ते 26 नोव्हेंबर) पर्थ स्टेडियम, पर्थ
दुसरी कसोटी: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (6 ते 10 डिसेंबर) ॲडलेड ओव्हल, ॲडलेड
तिसरी कसोटी: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (14 ते 18 डिसेंबर) द गाबा, ब्रिस्बेन
चौथी कसोटी: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (26 ते 30 डिसेंबर) मेलबर्न क्रिकेट ग्राउंड, मेलबर्न
पाचवी कसोटी: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (3 ते 7 जानेवारी) सिडनी क्रिकेट ग्राउंड, सिडनी
इतर बातम्या
Join Whatsapp Group