सरकार विरोधात मविआचा ''या'' दिवशी जोडे मारो मोर्चा
सरकार विरोधात मविआचा ''या'' दिवशी जोडे मारो मोर्चा
img
दैनिक भ्रमर
मालवणच्या राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर, सरकारवर  जोरदार टीका करण्यात येत आहे.  दरम्यान , आता महाविकास आघाडी सरकार विरोधात जोडे मारो आंदोलन करणार आहे. उद्धव ठाकरे, शरद पवार आणि नाना पटोलेंची मातोश्रीवर बैठक झाली आणि त्यानंतर रविवारी 1 सप्टेंबरला मुंबईत हुतात्मा स्मारकापासून ते गेट वे ऑफ इंडिया पर्यंत मोर्चाची घोषणा केली.  शिवरायांच्या पुतळ्यावरुन सरकारला जाब विचारण्यासाठी महाविकास आघाडीनं 1 तारखेला जोडे मारो आंदोलन हाती घेतलं आहे.

दरम्यान आज शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर राणे आणि आदित्य ठाकरेही राजकोट किल्ल्यावर आले होते. ठाकरे आणि राणे समर्थक यांच्याच आधी घोषणाबाजी झाली आणि नंतर राडा झाला. मालवणमध्ये जो राडा झाला, त्या दरम्यान खासदार नारायण राणेंचा संताप पोलिसांवरच उमटला. मध्यस्थी करण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांसह जयंत पाटीलही पुढे सरकारवले आणि काही वेळानंतर, अखेर पोलिसांनी नारायण राणे, निलेश राणेंसह कार्यकर्त्यांना रोखलं आणि मुख्य मार्गानंच आदित्य ठाकरे आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांना किल्ल्याच्या बाहेर काढलं.

इतर बातम्या
Join Whatsapp Group