उद्धव ठाकरेंवर महाविकास आघाडीची मोठी जबाबदारी? CM पदाचा चेहरा मात्र तूर्तास नाही
उद्धव ठाकरेंवर महाविकास आघाडीची मोठी जबाबदारी? CM पदाचा चेहरा मात्र तूर्तास नाही
img
Dipali Ghadwaje
मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने महाविकास आघाडीची जोरदार तयारी सुरू आहे. त्यात उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात मविआ निवडणूक लढणार का असा प्रश्न निर्माण होत आहे.  महाविकास आघाडीचे प्रचार प्रमुख उद्धव ठाकरे असतील वृत्त एका वृत्त संस्थेने दिले आहे .

महाविकास आघाडीचे सरकार असताना मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी केलेले काम त्यामुळे त्यांच्यात हाती मविआच्या प्रचाराची धुरा असावी असं अनेकांचे मत आहे. मात्र मविआचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण असेल यावर मात्र निवडणुकीच्या निकालानंतरच ठरवलं जाईल असंही बोललं जात आहे. 

दरम्यान महाविकास आघाडीने मुख्यमंत्रिपदाचा चेहरा पुढे करून निवडणुकीला सामोरे जावं यासाठी ठाकरे गट आग्रही होता.

त्याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांचा ३ दिवसीय दिल्ली दौरा झाला. त्यात काँग्रेसच्या सोनिया गांधी, मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी यांची भेट घेतली. उद्धव ठाकरे यांना मविआचा चेहरा बनवावा असं संजय राऊत सातत्याने सांगत आहेत. मात्र काँग्रेसनं त्यास नकार दिला. परंतु महाविकास आघाडीच्या काळात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते. त्यांच्या नेतृत्वावर अनेकांना विश्वास आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचा जो प्रचार निवडणुकीत केला जाईल त्याचे प्रमुख उद्धव ठाकरे असावेत असं काँग्रेस नेत्यांना वाटते. 

त्याचसोबत महाविकास आघाडीचा एक समान जाहिरनामा तयार करण्यात येत आहे. त्याची विशेष जबाबदारी काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांना सोपवण्यात आली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी प्रचार प्रमुखपदाची जबाबदारी घ्यावी. मविआच्या प्रचाराची धुरा उद्धव ठाकरेंकडे सोपवण्यात काँग्रेस तयार आहे. त्याबाबतचा प्रस्ताव आला आहे. मात्र मुख्यमंत्रिपदाबाबत जो काही निर्णय असेल तो निवडणूक निकालानंतरच घेतला जाईल असं काँग्रेसनं स्पष्ट केले आहे. १६ तारखेला मुंबईत महाविकास आघाडीचा पहिला मेळावा होत आहे त्यात उद्धव ठाकरे प्रचाराचे नेतृत्व करतील याची अधिकृत घोषणा केली जाऊ शकते. 
 
इतर बातम्या
Join Whatsapp Group