राजकीय : विधानसभेसाठी उमेदरवारांचा पडला पाऊस ; कुणाला लॉटरी लागणार?
राजकीय : विधानसभेसाठी उमेदरवारांचा पडला पाऊस ; कुणाला लॉटरी लागणार?
img
Dipali Ghadwaje
विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून उमेदवारी मिळावी यासाठी इच्छुकांची रीघ लागली असून अर्जांचा पाऊस पडला आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून इच्छुकांनी उमेदवारासाठी थोरल्या पवारांना साकडं घातलं आहे. या उमेदवारांकडून एक खास बाँड देखील लिहून घेण्यात आला आहे. राज्यात सध्या त्याचीच जोरदार चर्चा आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला विधानसभेला 85 ते 90 जागा मिळण्याची शक्यता आहे. 85 ते 90 जागांसाठी 1200 इच्छुक उमेदवारांचे पक्षाकडे अर्ज प्राप्त झाले आहे. राज्यांत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वाट्याला येणाऱ्या राखीव जागांसाठी जास्त अर्ज आल्याची माहिती मिळाली आहे. यामध्ये मोहोळ, फलटण, दिंडोरी, उदगीर, भुसावळ, मेहकर, मूर्तिजापुर, उमरेड, शहापूर, अंबरनाथ, माळशिरस विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे.

बाँडची राज्यभर चर्चा

इच्छुक उमेदवारांपैकी काही जणांनी थेट 100 रुपयांच्या बाँड पेपर उमेदवारी मिळाली नाही तरी अपक्ष लढणार नसल्याचं आश्वासन लिहून दिलं आहे. उमेदवारांनी बाँडवर प्रतिज्ञापत्र लिहून दिले आहे. राज्यातील 288 जागांपैकी कोणत्याही जागेसाठी आपल्या नावाचा विचार करण्यात आला नाही तर आपण बंडाळी करणार नाही. अपक्ष म्हणून निवडणूक लढणार नाही. विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला पाठिंबा देईल, असे उमेदवारांनी बाँडवर लिहून दिले आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group