''या'' कारणाने अजित पवारांनी मागितली जनतेची माफी ! काय आहे कारण ?
''या'' कारणाने अजित पवारांनी मागितली जनतेची माफी ! काय आहे कारण ?
img
दैनिक भ्रमर
मालवणच्या राजकोट किल्ल्यावरचा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळण्यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माफी मागितली आहे. ‘पुतळा कोसळला याला जबाबदार जो कोणी असेल त्याची चौकशी करून शिक्षा मिळेलच, पण मी राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून राज्यातल्या 13 कोटी जनतेची माफी मागतो’, असं अजित पवार म्हणाले आहेत. लातूर जिल्ह्यातील अहमदपूर येथे आयोजित लाडकी बहीण संवाद कार्यक्रमामध्ये अजित पवार बोलत होते

तसेच , ‘महाराजांचा पुतळा उभारताना तेथील भौगोलिक परिस्थिती आणि हवामान यासारख्या महत्वाच्या बाबींचा वैज्ञानिक अभ्यास केला होता का ? पुतळा बनवण्याच्या सामग्रीची गुणवत्ता याचा शोध घेत संबंधित जबाबदार लोकांची राज्य सरकारने तातडीने चौकशी करत गुन्हे देखील दाखल केले आहेत. लवकरात लवकर राजकोट किल्ल्यावर महाराजांच्या पुतळ्याची पुनर्स्थापना केली जाईल पण अशा प्रकारचा हलगर्जीपणा करणाऱ्या प्रत्येक संबंधितावर कडक कायदेशीर कार्यवाही केली जाईल’, असं अजित पवार म्हणाले आहेत.

दरम्यान  शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी शिल्पकार जयदीप आपटे आणि स्ट्रक्चरल कन्सलटंट चेतन पाटील यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर जयदीप आपटे आणि चेतन पाटील हे फरार आहेत.

इतर बातम्या
Join Whatsapp Group