सिंधुदुर्ग : राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा 35 फुटी पुतळा कोसळल्याची धक्कादायक बातमी समोर येत आहे. राजकोट किल्ल्याच्या किनारी शिवरायांचा हा पुतळा उभारण्यात आला होता. हैराण करणारी बाब म्हणजे २०२३ च्या डिसेंबर मध्येच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः मालवण मध्ये येऊन या भव्य दिव्य पुतळ्याचे अनावरण केलं होते. मात्र अचानक का पुतळा कसा काय कोसळला याचे कारण समजू शकलेलं नाही. मात्र या घटनेनंतर शिवप्रेमींनी संताप व्यक्त केला आहे.
नौदल दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याला सलाम म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण मध्ये पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला होता. हा पुतळा दुर्दैवानं कोसळला आहे. यामागचं कारण अजून कळू शकलेलं नाही. 4 डिसेंबर 2023 रोजी मालवणच्या राजकोट किल्ल्यावर या पुतळ्याचं अनावरण पंतप्रधान मोदींच्या हस्ते पार पडलं होतं.
कसा होता मालवण येथील शिवाजी महाराज पुतळा?
किल्ले राजकोट परिसराचं सुशोभीकरण तसंच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची जमिनीपासून उंची सुमारे 43 फूट एवढी आहे बांधकाम जमिनीपासून 15 फूट तर त्यावर 28 फूट उंच छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा असं स्ट्रक्चर आहे. हा पुतळा नौसनेकडून उभारण्यात आला. ज्याचं उद्घाटन 4 डिसेंबर 2023 रोजी, नौसेना दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते करण्यात आले. पुतळ्याची किंमत 2 कोटी 40 लाख 71 हजार एवढी रुपये एवढी होती. कल्याणचा तरूण शिल्पकार आणि मालवणचा सुपुत्र जयदीप आपटे यांनी हे शिल्प बनवलं आहे.